“मराठी बॉक्स क्रिकेट लीग” मध्ये शिलेदार ठाण्याने मारली बाजी


ImageImage
 
 
‘महाराष्ट्र कलानिधी’ आयोजित पहिली ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ नुकतीच लवासात मोठ्या दिमाखात संपन्न झाली. सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत आठ संघांमध्ये सामने खेळले गेले आणि यात बाजी मारली शिलेदार ठाणे या संघाने. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत सर्वच संघांनी कसून सराव करून एकमेकांना तोडीसतोड टक्कर दिली. विशेष म्हणजे अभिनेत्यांच्या बरोबरीने मराठी अभिनेत्रीनी देखील आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले.  
 
मस्त पुणे (सौ पूनम शेंडे ), डॅशिंग मुंबई (श्री अमेय खोपकर), फटाका औरंगाबाद (श्री पंकज जैन), शिलेदार ठाणे (श्री उत्तुंग ठाकूर), शूर कोल्हापूर (श्री अमर पाटील), क्लासिक नाशिक (श्री अंकित मगरे ), कोहिनूर नागपूर (श्री पंकज भोईर ),रत्नागिरी टायगर्स (श्री सुशांत शेलार) या आठ संघांनी यात सहभाग घेतला होता. उपांत्य फेरीत शूर कोल्हापूर विरुद्ध शिलेदार ठाणे आणि मस्त पुणे विरुद्ध कोहिनूर नागपूर यांच्यात लढत रंगली होती, तर अंतिम लढत श्री उत्तुंग ठाकूर यांच्या शिलेदार ठाणे विरुद्ध सौ पूनम शेंडे यांच्या मस्त पुणे या संघात रंगली. अटीतटीच्या सामन्यात अखेर बाजी मारली शिलेदार ठाणे संघाने आणि उत्तुंग ठाकूर या सामन्याचे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले.  ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ च्या ‘मॅन ऑफ द सिरीज’ प्रतिक हरपले यांना घोषित करण्यात आले, तर ‘वुमन ऑफ द सिरीज’चा किताब खुशबू तावडे यांना जाहीर झाला. माजी कसोटी क्रिकेटपटू दिलीप वेगंसरकर आणि संदीप पाटील यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान सोहळा संपन्न झाला. 
 
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर, सुबोध भावे, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव, सुनील बर्वे, उपेंद्र लिमये, मंगेश देसाई, अभिजीत खांडकेकर, नेहा पेंडसे, संजय जाधव, विजू माने, मेधा मांजरेकर, मनवा नाईक, क्रांती रेडकर, विजय पटवर्धन, हेमांगी कवी, अभिजीत पानसे, नम्रता गायकवाड, पूर्वा पवार, अजित परब, शशांक केतकर, विशाल इनामदार, संदीप पाठक अशा अनेक लोकप्रिय कलाकारांच्या सहभागामुळे हे सामने अधिकच रंगतदार ठरले. प्रत्येक कलाकारासाठी हा एक वेगळा अनुभव ठरला असून ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ ची पुढची सिरीज येत्या नोव्हेंबर मध्ये होणार असल्याचे महाराष्ट्र कालानिधीचे सचिव सुशांत शेलार यांनी जाहीर केले. मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या सामन्यांचे प्रसारण लवकरच  ‘९ एक्स झकास’ वाहिनीवरून होणार आहे. 
 ImageImageImageImageImage
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s