‘यस आय कॅन’


मुंबईच्या राजाच्या चरणीयस आय कॅनचा मुहूर्त

 final 1 final 2

अलीकडच्या काळात मराठी सिनेमांनी मिळविलेल्या घवघवीत यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीत नवचैतन्याचे वातावरण आहे. वेगवेगळ्या विषयांवर आशयघन चित्रपट निर्मिती करण्याकडे सध्या चित्रपट निर्मात्यांचा कल वाढतोय. श्री गणेशाच्या कृपाशिर्वादाने कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्याची प्रथा आहे. याच पार्श्वभूमीवर ‘जीगवी प्रॉडक्शन’ने ‘यस आय कॅन’ या आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच लालबाग, गणेशगल्ली येथील ‘मुंबईच्या राजा’च्या चरणी मोठ्या भक्तिभावाने केला. 

 

चित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगी अभिनेता राजेश शृंगारपुरे, बाल कलाकार मिहीर सोनी, चित्रपटाच्या दिग्दर्शिका संगीता राव व ‘यस आय कॅन’ची टीम उपस्थित होती. इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर असाध्य ते साध्य करण्याची क्षमता आपण आपल्यात आणू शकतो, अशा आशयाची कथा ‘यस आय कॅन’ या मराठी चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे. प्रेक्षकांना सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या निमित्ताने करण्यात येतोय. 

 

अमित शाह यांच्या कथेवर अभिजीत गाडगीळ व संगीता राव यांनी पटकथा लिहिली असून संवाद अभिजीत गाडगीळ यांनी लिहिले आहेत. ‘यस आय कॅन’ चे छायांकन नरेन गेडीया करणार असून संगीत – अक्षय खोत, कलादिग्दर्शन- राजू साप्ते, नृत्यदिग्दर्शन – संतोष पावनकर, ध्वनी – जावेद शेख, कार्यकारी निर्माता – शेखर नागवेकर, संकलन – हरकिरन लाल सिंग अशी इतर श्रेयनामावली आहे.

 

‘यस आय कॅन’ चित्रपटात राजेश शृंगारपुरे, नीना कुलकर्णी, मिहीर सोनी यांच्या प्रमुख भूमिका असून लवकरच याच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s