‘चिंतामणी’ सिनेमाचा फर्स्ट लूक लॉंन्च मोठ्या दिमाखात संपन्न!!


IMG_0618 IMG_1481

‘चिंतामणी’ सिनेमाच्या निमित्ताने अभिनेते भरत जाधव आणि अभिनेत्री अमृता सुभाष ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर!!

‘सत्या व्हिजन अचिव्हर्स स्पेक्ट्रम फिल्म्स’ च्या कल्पना सेट्टी, संगीता बालचंद्रन आणि सहनिर्माते प्रणव विनोद पाठक यांची पहिली-वहिली सिनेनिर्मिती असलेला सांगितला बालचंद्रन दिग्दर्शित ‘चिंतामणी हा सिनेमा येत्या ३१ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच सिनेमातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
‘चिंतामणी’ सिनेमाची कथा ही एका मध्यमवर्गीय माणसाच्या असामान्य कर्तुत्वाची आहे.   मुंबईच्या चाळीत आपल्या बायको आणि मुली सोबत राहणारा  ‘चिंतामणी’ आपल्या घरच्यांच्या आणि स्वतःच्या छोट्या-मोठ्या गरजा परिस्थितीमुळे भागवू शकत नाही त्यामुळे त्याला होणाऱ्या वेदनांची ही गोष्ट आहे. श्रीमंत माहेर असलेली प्रेमविवाह करून आणलेली बायको, सासऱ्यांच्या मते कुचकामी ठरलेला तिचा पती चिंतामणी. आपले बाबाही सुपरहिरो असावेत अशी माफक इच्छा असलेली १० वर्षाची मुलगी. त्यांच्या अपेक्षेला चिंतामणी कधीच उतरलेला नसतो. मध्यमवर्गीय वृत्ती आणि पैसा आड येतो. इच्छा प्रत्येकाच्या मनात असतात पण त्यासाठी धमक लागते पण तीदेखील या चिंतामणीत नाही. ‘आल अंगावर घेतलं शिंगावर’  खरय अगदी अशीच गोष्ट चिंतामणीच्या आयुष्यात घडते. वर्तमानपत्र आणि अनेक इतर माध्यमातून आज विविध प्रकारच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या आपण आवर्जून वाचतो ही. परंतु …एक जाहिरात तुमच आयुष्य बदलू शकते? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘चिंतामणी’ हा सिनेमा पहावा लागेल.
सिनेमाची कथा जशी सिनेमाच्या सुरुवातीला मला  जशी सांगण्यात आली तशीच ती पडद्यावर उतरवली याचा मला जास्ती आनंद असून दिग्दर्शिका संगीता बालचंद्रन यांचे करावे तेवढे कौतुक कमी असल्याचे अभिनेते भरत जाधव यांनी सांगितले. आजवर रसिक प्रेक्षकांनी मला अनेक भूमिकांमधून पाहिले आहे परंतु या सिनेमातील माझी व्यक्तिरेखा रसिक प्रेक्षकांना नक्कीच पसंतीस पडेल असा विश्वास अभिनेते भरत जाधव यांनी व्यक्त केला.
आजवर अनेक सिनेमांमध्ये मी काम केले असून अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ असून ही संधी मला संगीता बालचंद्रन यांनी दिली यासाठी मी त्यांची आभारी असल्याचे अभिनेत्री अमृता सुभाष यांनी सांगितले.
‘चिंतामणी’ सिनेमात अभिनेते भरत जाधव, अभिनेत्री अमृता सुभाष, रुचिता जाधव आणि  बालकलाकार तेजश्री वालावलकर यांच्या मुख्य भूमिका असून उदय टिकेकर, हेमांगी राव, मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, जयराज नायर, किशोर प्रधान, शोभा प्रधान, माधव देवचक्के आणि मोनिका दबडे यांच्याही भूमिका ही आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सिनेमाची कथा दीपक अनंत भावे यांची असून पटकथा आणि संवाद किरण श्रीनिवास कुलकर्णी आणि पल्लवी करकेरा यांनी लिहिले आहेत. या सिनेमात तीन वेगळ्या बाजाची गाणी असून ही गाणी अरविंद जगताप, सागर खेडेकर आणि संजीव कोहली यांनी लिहिली असून या तिन्ही गाण्यांना संजीव कोहली यांनीच संगीत दिले आहे. सुरेश सुवर्णा यांनी सिनेमाचे कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे.

 येत्या ३१ ऑक्टोबरला  …एक जाहिरात तुमच आयुष्य बदलू शकते का ? हे ‘चिंतामणी’ सिनेमातून आपल्याला उलगडणार आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s