तडफदार इन्स्पेक्टर रेणुका राठोडची युनिट ८ मध्ये एन्ट्री


srrff
नागपूर, २९ नोव्हेंबर २०१४: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्य’मध्ये लवकरच वऱ्हाडी ठसका

अनुभवायला मिळणार आहे. ‘लक्ष्य’च्या युनिट ८ मध्ये तडफदार इन्स्पेक्टर रेणुका राठोडची एन्ट्री होत आहे.

सुप्रसिद्ध  अभिनेत्री श्वेता शिंदे ही भूमिका रंगवणार आहे. ११ डिसेंबर २०१४ पासून इन्स्पेक्टर रेणुका राठोड रात्री १०

वाजता  स्टार  प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार  आहे. इन्स्पेक्टर रेणुका राठोडची गुन्हेगाराला  शोधण्याची  आणि

त्याच्याकडून गुन्हा  कबुल करून घेण्याची एक आगळी-वेगळी पद्धत आहे. रेणुका जेव्हा तिच्या  दमदार आवाजात

आणि वऱ्हाडी ठसक्यात ” भैताड झाला काय बे ?” असा प्रश्न विचारते तेव्हा भल्या-भल्या गुन्हेगारांचा थरकाप उडतो.

या बरोबरच अनेकदा गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी  रेणुका वेषांतर करून गुन्हेगारांच्या गोटातही शिरते. युनिट ८

मधील सहकाऱ्यांना जरी ती कडक शिस्तीची वाटत असली तरी आतून ती तेवढीच मृदु आहे.

‘लक्ष्य’मालिका आता  नव्या स्वरूपात दिसणार आहे. आगामी एपिसोड्स मध्ये युनिट ८ चे कर्तबगार अधिकारी

‘स्पेशल केसेस’ सोडविणार आहेत . युनिट ८ च्या अधिकाऱ्यांची कार्यक्षमता , त्यांचा सच्चेपणा आणि निर्भयता

यामुळे ‘ दहशतवाद विरोधी लढा’ , ‘चांदीच्या तस्करीचा गुन्हा’ अशा   हाय-प्रोफाईल केसेस या  टीमकडे  सोपविण्यात

आल्या आहेत .  आतापर्यंत मुंबईमध्ये कार्यरत असणारे युनिट ८ महाराष्ट्र पोलिसांच्या विविध शहरातील केसेस

सोडविणार आहेत. मालिकेच्या आगामी भागात कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद , पुणे , नागपुर ,ईत्यादी शहरात

युनिट ८ ची टीम पोहोचणार आहे. याबरोबरच  इन्स्पेक्टर रेणुका राठोड आणि युनिट ८च्या  पोलिस अधिकाऱ्यांचे

थरारक   स्टंटस आणि  एक्शन   सीन  हे  खास आकर्षण असणार आहेत. अशा प्रकारचे स्टंटस आणि एक्शन

सीन्सचे चित्रण पहिल्यांदाच मराठी  टेलिव्हिजनवर दिसणार आहे. स्टंटस आणि एक्शन  सीन्सच्या

चित्रीकरणासाठी खास प्रशिक्षण लक्ष्यच्या कलाकारांना देण्यात आले आहे.   युनिट ८ चे अधिकारी आता जीपीएस

सारख्या  तंत्रज्ञानाचा  अधिकाधिक वापर करणार आहेत. तसेच  गुन्ह्यांची जलद उकल करण्यासाठी  अत्याधुनिक

फोरेन्सिक  प्रयोगशाळा  त्यांच्या दिमतीला असणार आहे.

या प्रसंगी बोलताना स्टार प्रवाहचे प्रोग्रामिंग हेड  जयेश पाटील म्हणाले की, “स्टार प्रवाह वाहिनीने स्त्री

व्यक्तिरेखांना नेहमीच प्रेरणादायी भूमिकेत दाखविले  आहे .  इन्स्पेक्टर रेणुका राठोड याचेच एक उत्तम उदाहरण

आहे.  लक्ष्य  या मालिकेचा  स्वत:चा  असा खास प्रेक्षकवर्ग आहे . या प्रेक्षकवर्गाच्या प्रवाहात  अधिकाधिक तरुणाईला

समाविष्ट करण्यासाठी स्टार प्रवाह  ‘लक्ष्य’ मालिका नवीन अवतारात सादर करीत आहे.  स्टंटस आणि  एक्शन

सीन च्या  समावेशाबरोबरच  सगळ्यांनाच   भावतील असे काही बदल या मालिकेत करण्यात आले आहेत.”

तिची सटकली की भल्या भल्यांची लागते वाट

इनस्पेक्टर रेणुका राठोड जॉईन करतेय युनिट 8

पहायला विसरू नका ‘ लक्ष्य’  दर गुरुवार -रविवार रात्री १० वाजता

फक्त स्टार प्रवाहवर

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s