‘साटं लोटं’चा युथफुल लूक


1 2 3 4 5
 
मैत्री..  प्रेम.. या पलीकडे तरुणांचे नातेसंबंध, लाईफस्टाईल, वेगवान आयुष्याबद्दलचे त्यांचे विचार आजच्या काळाप्रमाणे झपाट्याने बदलत चाललेत.  तरुणाईचा हाच जोश, सळसळता उत्साह मुव्हिंग पिक्चर्स’ प्रस्तुत नितीन तेज अहुजा, अशोक भूषण निर्मित ‘साटं लोटं’ या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे.  मराठीत उत्तोमोत्तम कलाकृती सादर करणाऱ्या श्रावणी देवधर यांच्या दिग्दर्शनाची कमाल बऱ्याच अवधीनंतर पुन्हा नव्याने अनुभवायला मिळणार आहे.
 
नुकताच चित्रपटाच्या ट्रेलरची आणि गाण्यांची खास झलक मुंबईत आयोजित सोहळ्यादरम्यान दाखवण्यात आली. चित्रपटाच्या टीमसमवेत हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील असंख्य मान्यवर या प्रसंगी आवर्जून उपस्थित होते. निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर, महेश कोठारे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, गायक-संगीतकार शंकर महादेवन, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, लेखक – श्रीरंग गोडबोले, कलाकार मकरंद देशपांडे, श्रेयस तळपदे, यतीने कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, सुनील बर्वे, जयंत वाडकर, हेमंत ढोमे, क्षमा राज, सुकन्या कुलकर्णी, गिरीजा ओक, क्षिती जोग, दिपाली सय्यद, मानसी नाईक, नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकर, उमेश जाधव.. यांनी या प्रसंगी हजेरी लावली.  
‘थॉटरेन एंटरटेन्मेंट’चे सई देवधर-आनंद आणि शक्ती आनंद सहनिर्मित फन, रोमान्स आणि फुल्ल ऑफ ड्रामा असलेल्या ‘साटं लोटं’ या चित्रपटाचं फर्स्ट लूक लॉंचही हटके होतं.  पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, पूजा सावंत या युथफुल कलाकारांनी गमतीदार स्कीट सादर करत कार्यक्रमाचे धमाल सूत्रसंचलन केले.
आपल्या अफलातून अभिनयाने मकरंद अनासपुरे, पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, पूजा सावंत, नागेश भोसले, मालिनी डे  यांनी चित्रपटात धमाल उडवून दिली आहे. ‘साटं लोटं’ ची खळखळून हसवणारी कथा श्रावणी देवधर यांनी लिहिली असून खुमासदार पटकथा- संवाद शिरीष लाटकर यांनी लिहिलेत. श्रीरंग गोडबोले लिखित यातील गीतांना युवा संगीतकार सिद्धार्थ महादेवन व सौमिल शृंगारपुरे यांनी सुरेल संगीत दिलंय. चित्रपटाचे छायांकन राहुल जाधव यांनी केलंय. फ्रेश लूक, उत्तम कथानक, वास्तवदर्शी मांडणी, नेटकं दिग्दर्शन, कलाकारांचा सहज सुंदर अभिनय जोडीला अत्याधुनिक तंत्रज्ञांची साथ असलेला ‘साटं लोटं’ २० फेब्रुवारीला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s