स्टार प्रवाह वाहिनीवर दोन तास ‘संक्रांत स्पेशल’!


‘रुंजी’ आणि ‘देवयानी’च्या आयुष्यावर येईल का संक्रांत ?

मुंबई, १२ जानेवारी २०१५ : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रुंजी’ आणि ‘देवयानी’ या मालिका प्रेक्षकांच्या खास

पसंतीस उतरल्या आहेत. आजच्या काळातील युवतींचे  प्रतिनिधित्व  करणारी रुंजी  सगळ्याच

वयोगटातील प्रेक्षकांना भावली आहे. तर नुकतेच ९०० एपिसोड पूर्ण करणाऱ्या देवयानी मालिकेने

लोकप्रियतेचा नवा उच्चांक गाठला आहे. ‘रुंजी -रिशी’ आणि ‘देवयानी-एक्का’ या जोड्यांच्या आयुष्यात

हळुहळू प्रेम फुलू लागले आहे. पण त्यांचे हे प्रेम बहरत असताना आयुष्याच्या पुढच्या वळणावर नियतीने

काय ठेवले आहे याची कल्पना या दोन्ही जोड्यांना नाही आहे. पण ‘रुंजी -रिशी’ आणि ‘देवयानी-एक्का’

यांच्या प्रेमाला कुणाची नजर तर लागणार नाही ना ? संक्रांत स्पेशल एपिसोडमध्ये ‘रुंजी’ आणि ‘देवयानी’

या मालिकांमध्ये एक वेगळेच नाट्य प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. १५ जानेवारी २०१५ रोजी रात्री

८ वाजता रुंजी आणि रात्री ९ वाजता देवयानी या मालिकेचे महा-एपिसोड्स प्रसारित होणार आहेत.

रुंजीने पिटकर कुटुंबात आल्यापासून मिनाक्षीकाकूंच्या साम्राज्याला एकप्रकारे धक्का दिला आहे. अत्यंत

चतुराईने रुंजीने काकूंचे सगळेच प्लान हाणून पाडले आहेत. त्याचबरोबर रिशीची आई अपर्णाला तिचा मान

मिळवून दिला आहे. या सगळ्यामुळे बिथरलेली मिनाक्षीकाकू आता चांगलीच पेटून उठली आहे आणि तिने

रुंजीचा काटा काढायचे ठरविले  आहे. तर देवयानीने एक्काला गुन्हेगारी जगतापासून तोडून चांगल्या

मार्गावर आणले आहे. सुरेखाने केलेल्या अनेक कट-कारस्थानांवर देवयानीने मात केली आहे. एक्काला

देवयानीनेच  आपल्यापासुन हिरावुन घेतले आहे या भावनेने पछाडलेल्या  सुरेखाने  आता  देवयानीलाच

एक्कापासून कायमचे वेगळे करायचे कारस्थान रचले आहे.

काय असेल मिनाक्षीकाकू आणि सुरेखाचे कारस्थान? ही संक्रांत ‘रुंजी’ आणि ‘देवयानी’च्या जीवावर बेतेल?

पाहायला विसरू नका

१५ जानेवारी २०१५ रोजी रात्री ८ वाजता ‘रुंजी’ आणि रात्री ९ वाजता ‘देवयानी’

फक्त स्टार प्रवाहवर !

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s