मॅारिशस मध्ये रंगणार ‘अजिंक्यतारा’ पुरस्कार सोहळा_DSC7240 LOGO

मराठी चित्रपट कलाकृतींचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सन्मान करणारे पुरस्कार सोहळे सर्वत्र चर्चेत असताना ‘अजिंक्यतारा’ ह्या आगळ्या वेगळ्या पुरस्कार सोहळ्याची अनुभूती ही लवकरच मराठी रसिकांना घेता येणार आहे. ‘मराठी चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने ‘अजिंक्यतारा’ पुरस्काराच्या आयोजकांनी हे पहिलं पाऊल उचललं आहे. सुपरविस्टा एंटरटेण्मेंटने ‘अजिंक्यतारा’ या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.

या पुरस्कार सोहळ्याची अधिकृत घोषणा नुकतीच मुंबईत एका पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी अजिंक्यताराच्या सन्मानचिन्हाचे अनावरणसुपरविस्टा एंटरटेण्मेंटनच्या प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आलं. सुपरविस्टा एंटरटेण्मेंटनचे प्रतिनिधी व मान्यवर यावेळी उपस्थित होते. कलाकारांच्या कलागुणांची दखल घेण्यासाठी या  नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून, सर्वांसाठी हा एक वेगळा अनुभव असेल. ‘अजिंक्यतारा’ पुरस्काराचं भव्य स्वरूप मराठी माणसांसाठी अन्‌ महाराष्ट्रासाठी भूषणावह बाब असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं.

हा दिमाखदार सोहळा २२ ऑगस्टला मॅारिशसच्या स्वामी विवेकानंद कन्व्हेशन सेंटर या भव्य सभागृहात रंगणार आहे. या पुरस्कार सोहळ्याआधी होणाऱ्या विविध कार्यक्रमांतून सामाजिक व आध्यात्मिकतेचं भान जपत वेगळ्या कार्यक्रमांची मेजवानी ही असणार आहे. मॅारिशस येथील हिंदू हाऊस व वसंत भाऊ गोगटे यांच्या सहकार्याने मॅारिशसला गजानन महाराजांच्या मंदिराची स्थापना करण्यात येणार आहे. याचा आनंदोत्सव साजरा करण्यासठी येत्या शनिवारी २३ मे ला सायंकाळी ४.३० वाजता मुंबईत भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आहे. या शोभायात्रेच्या आनंदोत्सवात आयोजक व कलावंत उपस्थित राहणार आहेत.

या पुरस्कार सोहळ्याचा हेतू केवळ मनोरंजन नसून या सोहळ्याद्वारे आंतरराष्ट्रीय व्यवसाय वृद्धी करण्याचाही आयोजकांचा मानस आहे. या पुरस्कार सोहळ्यासोबत राबवल्या जाणाऱ्या अनेक सामजिक उपक्रमांमुळे चांगला पायंडा पाडला जाईल असा विश्वास आयोजकांना आहे. या सोहळ्याबद्दल मराठी चित्रपटसृष्टीत कमालीची उत्सुकता आहे.

या सोहळ्यात मराठी मनोरंजन विश्वातील प्रतिभावान कलावंत रंगारंग कार्यक्रम सादर करणार आहेत. या पुरस्काराच्या झगमगाटात कलाविष्काराच्या अनोख्या मैफिली रंगणार आहेत. नृत्य-गाणी, विनोदी प्रहसन अशा बहारदार मेजवानीने रंगलेला मराठी कलावंतांचा इंटरनॅशनल जागर मराठी कलासंस्कृतीला वेगळं आयाम मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.

‘सुपरविस्टा एंटरटेण्मेंट’ आयोजक असलेल्या या पुरस्कर सोहळ्यासाठी‘सिनेयुग ग्रुप ऑफ कंपनी’ इव्हेंट मॅनेजमेंट पार्टनर असून ‘किड्झेनिया’ मुंबई वेन्यु पार्टनर असणार आहेत.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s