विनोदी अंगाने तरुणाईला चिमटा घेणारा ‘साटंलोटं…पण सगळं खोटं’


This slideshow requires JavaScript.

 नेहमी वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट बनवणाऱ्या लेखिका-दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांचा साटंलोटं… पण सगळं खोटं‘ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मराठीतील मातब्बर कलाकारांसोबत श्रावणी देवधर यांनी बनवलेला ‘सरकारनामा’ खूप गाजला. याखेरीज ‘लपंडाव’ आणि’लेकरू’ या दोन मराठी चित्रपटांमध्येही श्रावणी यांनी विविधांगी विषय हाताळले होते. हिंदीत’सिलिसला है प्यार का’, ‘पहचान’ आणि ‘घरौंदा’सारखे चित्रपट बनवणाऱ्या श्रावणी साटंलोटं… पण सगळं खोटं मध्ये युथफुल विषय घेऊन आल्या आहेत.

एखाद्या विषयाला विविध पैलू पाडत अतिशय रंजक पद्धतीने तो रसिकांसमोर मांडण्यात श्रावणी यांचा हातखंडा आहे. साटंलोटं…पण सगळं खोटं हा सिनेमाही याला अपवाद नाही.साटंलोटं… पण सगळं खोटं बाबत श्रावणी म्हणाल्या, ”आजवर नेहमीच वेगवेगळे विषय हाताळले असल्याने आता कोणता नवीन विषय मांडायचा हा प्रश्न होता. बराच विचार केल्यानंतर एक युथफुल सिनेमा बनवण्याचा विचार मनात आला आणि साटंलोटं…पण सगळं खोटंला चालना मिळाली. हा चित्रपट तरुणांवर आधारित आहे. आजची तरुण पिढी एक्स्ट्रा स्मार्ट आहे. त्यांच्याकडे सगळ्यांची उत्तरं आहेत. ही पिढी जितकी हुषार आहे तितकीच ती शॉर्टकट मारण्यातही पटाईत आहे. झटपट पैसा कमावण्याचं वेड या पिढीला लागलं आहे. भविष्याची कसलीही चिंता नाही की भविष्य सुखकर व्हावं यासाठी कोणतीही आखणी नाही. कधी कधी या पिढीचं आश्चर्य वाटतं. त्यामुळेच या विषयावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. खोटं बोलणं हे आजच्या पिढीची जणू सवयच बनून गेली आहे. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. अशा समस्यांचा सामना करताना पालकांनी त्यांच्यावर कुठेतरी खोलवर रुजवलेले संस्कार कामी येतात.’साटंलोटं’मध्ये नेमकं हेच अचूकपणे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना निखळ आनंद लुटता येईल. प्रथमच कॉमेडी केली असली तरी त्याला कुठेही अश्लिलतेचा स्पर्श नाही.”

श्रावणी देवधर यांच्या करियरमध्ये देबू देवधरांचा खूप मोठा वाटा आहे. आज देबू हयात नाही, पण आजही देबू आपल्या पाठीशीच आहेत असं मानत श्रावणी यांनी ‘साटंलोटं’ बनवला आहे. या कामी त्यांना सई देवधरची मोलाची साथ लाभली आहे. या अत्यंत भावुक विषयावर बोलताना सई म्हणाल्या, ”देबूंचं स्वप्न साकार केलं आहे. देबूंच्या आशीर्वादामुळेच ‘साटंलोटं’सारखा छान चित्रपट बनवता आला. आज देबू जिथे कुठे असतील तिथून आम्हाला पाहात असतील तर त्यांना आमचा अभिमानाच वाटेल असा चित्रपट आम्ही बनवला आहे. आम्ही अशासाठी कारण आता सईची मला साथ लाभली आहे. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी पार पाडताना चित्रपटाच्या मेकिंगमध्ये कुठेही ढवळाढवळ न करता सारं काही चोख आहे की नाही यावर सईची नजर असायची. प्रत्येक सीन, प्रत्येक लोकेशन, प्रत्येक पात्र, प्रत्येक कलाकाराचा गेटअप… साऱ्याकडे सई जातीने लक्ष द्यायची. त्यामुळे माझं काम खुप सोपं झालं.”

‘मुव्हिंग पिक्चर्स’ची निर्मिती असलेल्या साटं लोटं.. पण सगळं खोटं या चित्रपटात आदीनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, पूजा सावंत, मकरंद अनासपुरे, पुष्कर श्रोत्री यांसारखे कलाकार आहेत. याविषयी बोलताना श्रावणी यांनी सर्व कलाकारांचं तोंड भरून कौतुक केलं. त्या म्हणाल्या, ”सर्वांनी आपापल्या पात्रांना योग्य न्याय दिला आहे. प्रत्येक कलाकार आपापल्या भूमिकेत अगदी फीट बसल्याने कथेला योग्य न्याय मिळाला आहे. एकीकडे आदीनाथ आणि सिद्धार्थची युथफुल जोडी आहे तर दुसरीकडे मकरंद आणि पुष्करची हरहुन्नरी जोडी आहे. त्यांच्या जोडीला मृण्मयी आणि पूजासारख्या अभिनेत्री आल्याने एक वेगळंच रसायन तयार झालं आहे. नागेश गोखलेने यात सुरेख खलनायक साकारला आहे. पण हा खलनायक विनोदी असल्याने तो पडद्यावर पाहताना प्रेक्षकांनाही एक वेगळा अनुभव घेता येईल. निशिगंधा वाडने आदीनाथच्या आईची आणि मकरंदच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. एकूणच सर्व कलाकारांची उत्तम केमिस्ट्री जुळल्याने जे रसायन तयार झालं आहे ते प्रेक्षकांना हसवेलही आणि अंतर्मुख होऊन विचार करायलाही लावेल.”

साटं लोटं...पण सगळं खोटं हा चित्रपट ५ जून रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत ‘थॅाटट्रेन एंटरटेनमेंटचं आणि सई-देवधर आनंद, शक्ती आनंद यांचंमोलाचं सहकार्य लाभलं आहे. दिग्दर्शनाखेरीज अनोख्या लेखनशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या श्रावणी यांनीच साटं लोटं.. पण सगळं खोटं ची कथाही लिहिली आहे. त्यावर शिरीष लाटकर यांनी पटकथेचा डोलारा उभारत संवादलेखनही केलं आहे. गीतरचना श्रीरंग गोडबोले यांच्या असून संगीत सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल श्रृंगारपुरे यांचं आहे. वास्तवदर्शी चित्र पडद्यावर उमटवण्यात हातखंडा असणाऱ्या कॅमेरामन राहुल जाधव यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s