‘साटंलोटं-पण सगळं खोटं’ मान्यवरांसाठीच्या विशेष खेळाला तारे-तारकांची मांदियाळी


 

 

This slideshow requires JavaScript.

दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांचा ‘साटंलोटं-पण सगळं खोटं’ हा सिनेमा येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. त्यानिमित्ताने बुधवारी मुंबईत या सिनेमाचा मान्यवरांसाठी विशेष खेळ आयोजित करण्यात आला होता.

या खेळाला मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांची मांदियाळी जमली होती. दिग्दर्शिका श्रावणी देवधर, सई देवधर,शक्ती आनंदसह मकरंद अनासपुरे, नागेश भोसले, पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, पूजा सावंत हे चित्रपटाचे कलावंत यावेळी उपस्थित होते. त्याचसोबत सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, सुनील बर्वे, उर्मिला कानिटकर, अमितराज, प्राची शाह, शुभा खोटे, भावना बलसावर, मानिनी डे, मिहीर मिश्रा, यांच्यासह मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरही हजर होते.

‘साटं लोटं.. पण सगळं खोटं’ या चित्रपटाची कथा तरूण पिढीच्या आजच्या विचारसरणीवर आधारित आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांनी बऱ्याच वर्षांनी कमबॅक केलं आहे.’मुव्हिंग पिक्चर्स’ व ‘थॅाटट्रेन एंटरटेनमेंट’प्रस्तुत ‘साटंलोटं- पण सगळं खोटं’ हा युथफुल कॉमेडी चित्रपट 5 जूनला रिलीज होतं आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s