७ जून ला निमो बच्चेकंपनीच्या भेटीला येणार ‘फाईंडिंग निमो’ चित्रपटाची धमाल झी टॉकीजवर


jkjujjuu

डिस्नेची जादुई दुनिया झी टॉकीजवर अवतरली आहे. झी टॉकीजवरील डिस्ने चित्रपट महोत्सवात ७ जून ला डिस्ने कुटुंबातला निमो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फाईंडिंग निमो’ ह्या चित्रपटात निमो ह्या आपल्या चळवळ्या मुलाला शोधणाऱ्या त्याच्या बाबा माशाची-क्‍लाऊन फिशची ही गोष्ट आहे.

या चित्रपटातून समुद्र विश्वाचं अफलातून दर्शन तर घडतचं पण मोठ्यांचं न ऐकल्याने कशी फजिती होऊ शकते हे याची मजेशीर गोष्ट ‘फाईंडिंग निमो’ चित्रपटातून पाहायला मिळेल. निमो माशाच्या प्रवासाचं नाट्य विनोदी पद्धतीने रंगवताना त्याला हृदयस्पर्शी किनारही आहे. रंजनाबरोबर मौलिक संदेशही हा चित्रपट देतो. रंगेबेरंगी माशांची ही धमाल सफर पाहताना बच्चेकंपनी सोबत मोठेही फुल टू धमाल करतील.

‘फाईंडिंग निमो’ हा चित्रपट रविवारी ७ जूनला दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता पाहता येईल. झी टॉकीजने पेश केलेला डिस्ने विश्वाचा अनोखा नजराणा कुटूंबातल्या प्रत्येकासाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.

झी टॉकीज महाराष्ट्रातील मराठी चित्रपट रसिकांची खास जिव्हाळ्याची चित्रपट वाहिनी असून गेल्या काही वर्षातच या वाहिनीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेय. मराठी चित्रपटांचा मूल्यवान खजिना झी टॉकीज वाहिनीने जपला आहे. या चित्रपटांना रसिकांनी नेहमीच उत्तम प्रतिसाद दिलाय. रसिकांनी दिलेल्या या भरभरून प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना झी टॉकीज ने मनोरंजनाचे अनोखे नजराणे पेश केले आहेत. झी टॉकीजच्या या नित्य नव्या प्रयत्नांना रसिकांनीही  खूप उचलून धरले आणि म्हणूनच मनोरंजनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी झी टॉकीजला सतत प्रोत्साहन मिळत आले. याच उत्साहातून अनेक गाजलेले चित्रपट,अनेक क्लासिक चित्रपटांचे महोत्सव, कॉमेडी चित्रपटांची जत्रा यासोबतच सिनेताऱ्यांच्या भेटी किंवा चित्रसृष्टीचे देदीप्यमान सोहळे रसिकांना घरबसल्या अनुभवता आले.

वैविध्यपूर्ण मनोरंजनाची ही वैभवशाली परंपरा जोपासत झी टॉकीज या सुट्टीत आपल्या छोट्या दोस्तांसाठी एक खास आश्चर्यकारक भेट घेऊन दाखल झाली. अॅनिमेशन चित्रपटांची ही जादुई दुनिया केवळ छोट्या मित्रांसाठीच नव्हे तर कुटूंबातल्या प्रत्येकासाठी आनंदाची पर्वणी ठरावी, असे वाटतेय. झी टॉकीजवरील या चित्रपटांमुळे छोट्या दोस्तांची यावेळची सुट्टी आणखीनच बहारदार झाली. मनोरंजनाचा हा आगळा वेगळा धमाका झी टॉकीजच्या आजवरच्या प्रवासातला आणखी एक परमोच्च बिंदू ठरेल अशी आशा आहे, असे झी टॉकीज चे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले.

डिस्ने आणि डिस्ने पिक्सार चे चित्रपट प्रादेशिक भाषांमध्ये मोठ्याप्रमाणात वितरीत करण्यासठी डिस्ने आणि डिस्ने पिक्सार ने नेहमीच पुढाकार घेतला आहे. डिस्ने मिडिया डिस्ट्रीब्युसन ने आजवर आपले सर्वाधिक कार्यक्रम वेगवेगळ्या  भाषांमध्ये प्रसारित केले आहेत. डिस्ने मिडिया डिस्ट्रीब्युसन चे १३,००० प्लॅटफॉर्म पार्टनर २४० प्रभागात हे कार्यक्रम जगभरात प्रसारित करतात.डिस्ने मिडिया डिस्ट्रीब्युसन भारतातल्या वेगवेगळ्या वाहिन्यांबरोबर काम करते.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s