‘भय’ लवकरच तुमच्यासमोर


2 VCVCV

माणसाच्या मनातल्या भीतीवर भाष्य करणाऱ्या ‘भय’ या आगामी मराठी सिनेमाची पहिली झलक सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीतीत नुकतीच दाखवण्यात आली. दमदार कथानक,  युवा कलाकार, श्रवणीय संगीत आणि त्याला कल्पक दिग्दर्शनाची जोड यामुळे ‘भय’ हा चित्रपट रसिकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. भय चित्रपटाचं पोस्टर उत्सुकता वाढवणार ठरलं आहे.

निर्माते सचिन कटारनवरे व सहनिर्माते अजय जोशी, अनिल साबळे यांनी नाविन्यपूर्ण आशयाच्या ‘भय’चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर वेगळ्या धाटणीच्या या सिनेमाच्या दिग्दर्शनाची आणि संकलनाची जबाबदारी राहुल भातणकर यांनी सांभाळली आहे. कथा, पटकथा, संवाद नितीन सुपेकर यांचे असून शेखर अस्तित्व यांनी गीते लिहिली आहेत. या गीतांना अजित समीर यांचा संगीतसाज आहे. कलादिग्दर्शन प्रशांत राणे याचं आहे. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी आशिष चव्हाण यांनी सांभाळली आहे.

५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत या चित्रपटात अभिजीत खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, विनीत शर्मा, संस्कृती बालगुडे, सिद्धार्थ बोडके यांचा अभिनय प्रेक्षकांना पहायला मिळेल.

माणसाचे मन ही मोठी अजब गोष्ट आहे. मनाचे भाव, भावना आणि माणसाचे वर्तन यातल्या फार कमी गोष्टींचा विज्ञानाला उलगडा झाला आहे. भीती ही प्रत्येकाच्या मनात असते. ही भीती कशाचीही असू शकते. उंचीची, गर्दीची, एकटेपणाची अगदी कशाचीही भीती एखाद्याला सतावत असते. काही लोकांच्या मनात ही भीती वाढते हे पॅरानॉईड स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. या आजाराने ग्रस्त व्यक्तींना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर ते कशाप्रकारे मात करू शकतात या विषयावर ‘भय’ हा चित्रपट भाष्य करतो.भीती मनात ठेऊन जगणाऱ्या व्यक्तींना काय अडचणींना तोंड द्यावे लागते याचा गुंगवून टाकणारा प्रवास म्हणजे…‘भय’ हा चित्रपट.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s