‘भय’ चित्रपटातून घडणार दुबई सफर


01 2 3 4

अर्थपूर्ण शब्दरचना, श्रवणीय संगीत आणि सुरेल गायकीसोबतच गाण्यांना दिली जाणारी व्हिज्युअल ट्रीटमेंटही अलीकडच्या काळात मराठी चित्रपटांत अधिक महत्त्वाची ठरली असून त्याचा प्रत्यय ‘भय’ या आगामी मराठी चित्रपटाद्वारे पाहता येणार आहे. बुर्ज खलिफा, बुर्ज अल अरब, मरीना बीच, एमिरेट्स टॉवर या दुबईतील खास लोकेशन्सवर नुकतेच या चित्रपटातील २ गाण्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत ‘भय’ या चित्रपटातील शेखर अस्तित्व यांनी लिहिलेल्या ‘साजणा’ आणि ‘मी आलो’ या दोन वेगळ्या धाटणीच्या गीतांना ब्रिजेश शांडिल्य आणि तुलिका उपाध्याय यांच्या सुमधूर आवाजात स्वरबद्ध केलं गेलंय. विक्रम मोन्त्रोस यांच्या संगीतावर स्मिता गोंदकर, अभिजीत खांडकेकर, संस्कृती बालगुडे आणि सिद्धार्थ बोडके यांनी ताल धरलाय.तसेच नृत्यदिग्दर्शक अजय देवरुखकर, सिनेमॅटोग्राफर राजेश राठोर आणि दिग्दर्शक-संकलक राहुल भातणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन्ही गाणी हटक्या पद्धतीने शूट केली गेली असून विशेष म्हणजे क्रुझ-हेलिपॅडवरील दृश्ये आणि दुबईतील प्रसिद्ध बीचेसची अनोखी सफर या गाण्यांद्वारे रसिक-प्रेक्षकांना करता येणार आहे.

निर्माते सचिन कटारनवरे, सहनिर्माते अजय जोशी आणि अनिल साबळे यांनी नाविन्यपूर्ण आशयाच्या ‘भय’ चित्रपटाची निर्मिती केली असून सतत कशाना कशाची तरी भीती मनात ठेऊन जगणाऱ्या व्यक्तींना काय अडचणींना तोंड द्यावं लागतं याचा गुंगवून टाकणारा प्रवास दर्शवणारा ‘भय’ पॅरानॉईड स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर आजारावर भाष्य करतो. या चित्रपटाची कथा-पटकथा-संवादाची जबाबदारी नितीन सुपेकर यांनी सांभाळली आहे. अभिजीत खांडकेकर,सतीश राजवाडे, उदय टिकेकर,विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, स्मिता गोंदकर आणि संस्कृती बालगुडे अभिनित ‘भय’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s