‘प्रेमकहानी’ एक लपलेली गोष्ट सिनेमाचे दिमाखदार पोस्टर लाँच


_02

मराठी चित्रपटात अनेक उत्तम विषय अलीकडे चांगल्या प्रकारे हाताळलेले दिसतात. एक वेगळा विषय असलेलासतीश रणदिवे दिग्दर्शित प्रेमकहानी’ एक लपलेली गोष्ट या मराठी सिनेमाचे पोस्टर लाँच नुकतंच कलाकार व तंत्रज्ञ  यांच्या उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमात करण्यात आले. एस. एन मुव्हीज निर्मित प्रेमकहानी एक लपलेली गोष्ट या चित्रपटाचा फर्स्ट लूक यावेळी दाखवण्यात आला.

प्रेमकहानी’ एक लपलेली गोष्ट ही एक लव्ह स्टोरी असून या लव्ह स्टोरीत एक अनवट वळण येऊन आयुष्यच बदलवून टाकणा-या गोष्टी कशा घडत जातात याचा गुंगवून टाकणारा प्रवास पाहता येणार आहे. महाराष्ट्र व राजस्थान अशा दोन संस्कृतीचे दर्शन प्रेमकहानी’ या चित्रपटातून घडणार असून लालचंद शर्मा निर्मितप्रेमकहानी’ या चित्रपटातून नवोदित अभिनेत्री काजल शर्मा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

चित्रपटाची कथा सतीश रणदिवे यांनी लिहिली असून संवाद राज काजी, अभिजीत पेंढारकर यांनी लिहिले आहेत. योगेश, राजेश बामुगडे, प्रवीण कुवर यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांना बेला शेंडे, शाल्मली खोलगडे, भारती मढवी, पामेला जैन, जावेद अली यांच्या स्वराचे कोंदण लाभले असून प्रवीण कुवर यांची संगीतसाथ आहे. नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी आशिष पाटील, ओंकार शिंदे, माया जाधव, कार्तिक पॅाल यांनी सांभाळली आहे. छायांकन विजय देशमुख यांचे असून संकलन विजय खोचीकर यांचे आहे.

नवोदित अभिनेत्री काजल शर्मा व ‘महाराणा प्रताप’ फेम फैजल खान, यात मुख्य भूमिकेत असून उदय टिकेकर, किशोरी शहाणे-वीज, मिलिंद गुणाजी, निशिगंधा वाड, समीरा गुजर, डॉ. विलास उजवणे, कौस्तुभ दिवाण, राकेश, वैष्णवी रणदिवे यांच्या भूमिकासुद्धा यात आहेत.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s