अनिल-अरुण यांच्या अलौकिक संगीत प्रतिभेला अभिवादन ‘रुपेरी वाळूत’ सांगीतिक कार्यक्रम रंगणार


FBFDBFDB

एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल-अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचं गारुड आजही रसिकांच्या मनावर आहे. मराठीतले शंकर जयकिशन अशी ओळख असणाऱ्या या संगीतकार जोडीची कारकीर्द विलक्षण गाजली. मराठी चित्रपटसृष्टीत अनिल अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. अनिल मोहिले आणि अरुण पौंडवाल या जोडगोळीने यानंतरही अनेक अप्रतिम गाणी दिली. कोणताही वाद्यवृंद कार्यक्रम संगीतकार अनिल-अरुण या जोडीच्या गीतांच्या सादरीकरणा शिवाय पूर्णच होत नाही.

शब्द सूरांवर जबरदस्त हुकुमत असलेल्या या संगीतकार जोडीने अनेक हिट गाणी दिली आहेत. निर्माते शरद व सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटातील अनिल-अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या सर्वच गीतांनी गोल्डन व सिल्व्हर ज्युबली साजरी केली आहे. वसंत देशपांडे यांनी गायलेल्या ‘प्रथम तुला वंदितो’, आशा भोसले यांच्या ‘या रावजी बसा भावजी’ व सचिन पिळगावकर यांच्या बेबी डान्स बेबी या गीतांनीही चांगलीच दाद मिळवली होती. ‘नाव मोठ लक्षणं खोटं’ ‘अरे संसार संसार’, ‘गंमत जंमत’, ‘धूमधडाका’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘भुताचा भाऊ’, ‘अशी ही बनवा बनवी’ यातील सर्वच गीते आजही रसिकांच्या मनावर रुंजी घालतात.

संगीतात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या या संगीतकारांच्या गीतांची जादू आजही कायम आहे. त्यांच्या याच गीतांचा स्वरगंध ‘रुपेरी वाळूत’ या सांगीतिक कार्यक्रमातून पुन्हा दरवळणार आहे. भावगीत, चित्रपटगीत,लोकगीत, नाट्यगीत अशा सगळ्या दालनात मुशाफिरी करणाऱ्या या संगीतकार जोडीला ‘रुपेरी’ वाळूत’ या सांगीतिक सोहळ्यातून मानवंदना देण्यात येणार आहे.

अनुराधा पौडवाल यांनी या सांगीतिक कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. अनुराधा पौडवाल यांची दोन मुलं आदित्य पौडवाल व कविता पौडवाल या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांच्या भेटीला येणार आहेत. संगीत क्षेत्रातले हे दोन युवा गुणवंत चेहरे ‘रुपेरी वाळूत’ या कार्यक्रमातून अनिल-अरुण यांची गीते आजच्या पिढीपर्यंत पोहचवणार आहेत.

आदित्य पौडवाल, कविता पौडवाल व चंद्रशेखर महामुनी ह्या सुमधुर गीतांचा नजराणा सादर करतील. तसेच कलाकारांच्या कथनातून अनिल-अरुण यांच्या सांगीतिक आठवणीना उजाळा देण्यात येणार आहे. यासांगीतिक कार्यक्रमला मराठी व हिंदी सिनेजगतातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अनिल-अरुण यांच्या संगीतावर प्रेम करणाऱ्या पसंतीस हा खास कार्यक्रम उतरेल हे नक्की.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s