पुन्हा गरज या युगपुरुषाची ‘लोकमान्य – एक युगपुरूष’ चित्रपटाचा झी टॉकीज प्रीमिअर


1

द्रष्टे नेते असलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जाज्वल्य राष्ट्रप्रेमाच्या वेधक प्रवासाची कहाणी प्रत्येकासाठी स्फूर्तीदायक आहे. हे धगधगत पर्व झी टॉकीजवरील लोकमान्य- एक युगपुरूष’  या चित्रपटाच्या ‘झीटॉकीज’ प्रीमिअर मधून पुन्हा उलगडणार आहे.  30 ऑगस्ट दुपारी १२ वा. व सायं ६ वा. लोकमान्य – एक युगपुरूष चित्रपट झी टॉकीजवर प्रक्षेपित होणार आहे.

लोकमान्य चित्रपटाची कथा टिळकांच्या आयुष्याची व त्यांच्या विचारांची आहे. बहुमुखी, बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेलल्या लोकमान्य टिळकांची ओळख स्वातंत्र्यसैनिक, लेखक, पत्रकार, संपादक, गणितज्ञ, इतिहासकार,खगोलतज्ज्ञ अशी सुद्धा आहे. महापुरूष कालवश झाले तरी त्यांचे विचार हे कालातीत असतात. हे विचार कधीच मरत नाहीत. काळ कोणताही असो प्रत्येक पिढीसाठी ते विचार तेवढेच महत्त्वाचे असतात. हेच विचार आजच्या तरुणाईला पटवून देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. लोकमान्यांच्या विचारांचा पुरस्कार करणारा अन् त्यांच्या तत्त्वज्ञानाला नवी झळाळी देऊ पाहणारा हा सिनेमा आहे.

स्वराज्याचा ध्यास बाळगणा-या लोकमान्य टिळकांनी वेगवेगळ्या प्रसंगात कशी भूमिका घेतली, आपल्या तत्त्वांसाठी, मग ती जहाल असली तरी ते कसे आग्रही राहिले, परकीय इंग्रजांविरुध्द झगडताना स्वकीयांशी कसा लढा दिला, याचं दर्शन या चित्रपटातून घडतं. नीना राऊत निर्मित एस्सेल व्हिजन प्रस्तुत लोकमान्य -एक युगपुरूष या चित्रपटात सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, समीर विद्वांस, अंगद म्हसकर, प्रिया बापट, श्वेता भेंडे,दीपेश शहा, प्रशांत उथळे, विक्रम गायकवाड आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या आणि कार्याच्या जोरावर भारतीय स्वातंत्र्यलढय़ाला एक वेगळा आयाम मिळवून देणारे ‘लोकमान्य’ हे खऱ्या अर्थाने ‘युगपुरूष’ होते. भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील धगधगतं पर्व असणाऱ्या लोकमान्यांची जीवनगाथा ही असामान्य अशीच आहे.  लोकमान्य नेहमी म्हणत, ‘

स्वातंत्र्योत्तर काळातील पिढीने स्वत:च्या प्रगतीबरोबरच देशाच्या प्रगतीचाही विचार केला पाहिजे. देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले तरच त्यांची पिढी सुखी होईल आणि देश पुढे जाईल.’ त्यांचा हा विचार आजच्या पिढीने गांभीर्याने समजून घेऊन कृतीत आणला पाहिजे.

आज आपली राजकीय, सामाजिक परिस्थिती नैतिक मूल्य कमालीची ढासळत असतांना टिळकांच्या विचारांची गरज पदोपदी जाणवते. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने त्यांनी तरुणांच्या मनात स्फुलिंग चेतवले होते. या चित्रपटाच्या रूपाने दाखवली जाणारी लोकमान्य टिळकांच्या विलक्षण प्रवासाची अनुभूती आजच्या तरुणांसाठीसुद्धा प्रेरणादायी ठरेल हे नक्की.

प्रसारण – ३० ऑगस्ट दुपारी १२.०० वा. आणि सायं ६.०० वा. झी टॉकीजवर

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s