सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची गाथा सांगणारी सावित्री एक क्रांती दूरदर्शनवर नवी हिंदी मालिका


gngngf

समाजात स्त्री शिक्षणाची बीजे रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सावित्री एक क्रांती ही नवी हिंदी मालिका १४ सप्टेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्रो ८:३० वाजता दूरदर्शनच्या डीडी किसान वाहिनीवर सुरु होणार आहे. समाजातून प्रचंड प्रमाणावर टिका, अवहेलना सोसून स्त्री शिक्षणासाठी झपाटून काम केलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ह्या मालिकेची निर्मिती लहूशेट जाधव आणि हरीश सपकाळे यांनी केली असून दिग्दर्शन शिवदत्त शर्मा आणि जयदेव चक्रवर्ती यांचं आहे. या मालिकेसाठी संशोधन हरी नरके आणि नितीन आरेकर यांनी केले आहे.

विकास कपूर लिखित या मालिकेत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा आणि त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक कामांचा आढावा घेण्यात आला आहे. सावित्रीबाई यांना शिक्षणासाठी झालेला विरोध आदी काही महत्त्वाच्या घटनांचा यात समावेश आहे. मालिकेत धरीशा कल्याणी आणि प्रियंका पांचाळ ह्या अनुक्रमे छोट्या आणि मोठ्या सावित्रीबाई यांच्या भूमिकेत आहेत. याचप्रमाणे कुलदीप दुबे, प्रीती गिडवानी, विशाल भारद्वाज, दीप्ती भागवत, कविता वाधवा, अमित बेहल, शीश खान, रेश्मा गोखले, सोहम चौधरी यांच्याही भूमिका यात आहेत.

सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या आद्यशिक्षीका होत. ज्या काळात स्त्रियांना चूल व मूल यापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले होते. त्याकाळात सावित्रीबाई फुले ह्या महात्मा ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून समाजक्रांतीच्या चळवळीत अग्रेसर होत्या. आपले कार्य तडीस नेण्यासाठी त्यांनी सनातनी ब्राम्हणी समाजाकडून अपमान व अंगावर शेणखताचा मारा सहन केला. मुलींना शिकवायला जाताना त्यांच्या साडीवर शेण व चिखल फेकून खराब करण्यात येत असे परंतु आपल्या कार्यापासून त्या तसूभरही मागे सरल्या नाहीत.

सावित्रीबाईंनी त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतंत्र स्त्री म्हणून विचार केला. फक्त विचार करून थांबल्या नाहीत तर प्रत्यक्ष त्याप्रमाणे वाटचाल केली. ही वाटचाल सनातन काळात अत्यंत खडतर होती म्हणूनच त्यांनी घडवून आणलेल्या शैक्षणिक क्रांतीचे मोल अनमोल आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अत्यंत प्रेरणादायी असलेली सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती आजच्या पिढीला ज्ञात व्हावी या उद्देशानेच सावित्री एक क्रांतीया मालिकेची निर्मिती केल्याचं निर्माते हरीश सपकाळे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s