कर्मयोग्याची यशोगाथा झी टॉकीजवर


photo1

‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’  चित्रपटाचा झी टॉकीज प्रीमिअर

गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेलं कार्य सर्वश्रुत आहे. त्यांचाच वारसा पुढे चालवणा-या डॉ. प्रकाश आमटे यांनी हेमलकसा या दुर्गम ठिकाणी आदिवासींसाठी केलेल्या कार्याची ओळखही सर्वाना आहे. त्यांच्या जीवनावर, त्यांच्या कार्यावर, त्यांच्या प्रवासावर तयार करण्यात आलेला ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’  या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. डॉ. मोहन आगाशे, नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या सहजसुंदर अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाचा झी टॉकीज प्रीमिअर येत्या रविवारी, १३ सप्टेंबरला दुपारी १२.०० वा. व सायं ६.०० वा प्रक्षेपित होणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या जंगलातील अतिदुर्गम भागात दळणवळणाची साधनं, संवादाची माध्यमं आणि कोणत्याच सोयी सुविधा उपलब्ध नसताना डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची सुरूवात केली. हेमलकसाला १९७३ साली लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला तेव्हा तिथले माडिया गोंड आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते. त्या जंगलापलिकडचं जग त्यांना माहीत नव्हतं. शिक्षणाअभावी असलेलं अज्ञान, नक्षलवादी भाग, पोलिसी अत्याचार, शहरीकरणाचा वाराही जिथं पोहचलेला नाही असं जीवन तेथील आदिवासी जगत होते. त्यांना आरोग्याचं, शिक्षणाचं महत्त्व पटवून देत मुख्य प्रवाहात आणणं हे काम जेवढं जिकिरीचं तेवढंच आव्हानात्मकही होतं. हे आव्हान पेलत डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर या आदिवासी पाडयांमध्ये ज्ञानाचं नंदनवन फुलवलं.

या ‘अंधाराकडून उजेडाकडे’ झालेल्या प्रवासाचे संपूर्ण श्रेय लोकबिरादरी प्रकल्पाच्या विलक्षण प्रयत्नांना आहे. व्रतस्थ समाजसेवी बाबा आमटेंचं समाजसेवेचं व्रत स्वीकारलेल्या डॉ. प्रकाश आमटे दाम्पत्याची,त्यांच्या सहका-यांची आणि आमटेंच्या तिस-या पिढीची व एकूणच हेमलकसामधील एका विलक्षण जीवनप्रवासाची  यासाऱ्यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची, दुर्दम्य जिद्दीची कहाणी म्हणजे ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’ हा मराठी चित्रपट. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका अॅड. समृद्धी पोरे यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे.

शहराचे सुखवस्तू जीवन नाकारून आयुष्याची एक नवी सुरुवात करणं ही कल्पनाही अशक्यच. पण ही कल्पनाच नव्हे तर ते स्वप्न उराशी बाळगून आमटे दाम्पत्यांनी दुर्गम भागात जाऊन आणि आपल्या निस्सीम, निःस्वार्थ सेवेने आदिवासींच्या जीवनात नंदनवन फुलवले आमटे दाम्पत्याच्या संघर्षाची, त्यांच्या जिद्दीची कथा एक चांगला जीवनानुभव देते.

शहराच्या चकचकीत वातावरणात जगणा-या आणि सर्व सोयी सुविधा मिळत असूनही सतत तक्रार करणा-या अनेकांना या दाम्पत्याच्या यशाची गाथा अंतर्मुख करणारी आहे. मानवतेची सेवा करणाऱ्या या सेवाव्रतस्थांप्रमाणे आपण सेवेचा हा वसा कधी उचलणार हा प्रश्न झी टॉकीजच्या प्रीमिअरमधून उपस्थितीत करण्यात आला आहे. झी टॉकीज आणि एस्सेल व्हिजनची प्रस्तुती असलेला ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’ हा चित्रपट प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल.

प्रसारण १३ सप्टेंबर दुपारी १२.०० वा. व सायं ६.००

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s