खास गोष्टींची गोष्टोries मराठीतील अभिजात गोष्टी आता मोबाइल अॅपवर


IMG-20150922-WA0047

वाचाल तर वाचाल ही मराठी म्हण आत्मसात करत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या, पण हल्ली मनोरंजनाची साधनं वाढली तशी वाचनाचं प्रमाण कमी झालं. इंग्रजी माध्यमातून शिक्षणाच्या हल्लीच्या काळात तर मराठी पुस्तकांना नवा वाचक मिळणं दुर्मीळ झाल्याचं चित्र उभं राहिलंय. या परिस्थितीत नुसतेच दुःखाचे कढ काढत न बसता आजच्या तरुण पिढीपर्यंत मराठीतलं अभिजात साहित्य न्यायला हवं, या तळमळीतून आता मोबाइल अॅपच्या माध्यमातून ऑडिओ बुक आकाराला आलं आहे. गोष्टोries अशा वेगळ्या नावाचा हा तितकाच अभिनव प्रकल्प श्रोत्यांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.

गोष्टोries हे मोबाइल अॅप आता अँड्रॉइड व आयफोन, आयपॅडवर उपलब्ध आहे. गोष्टी अशा स्वरूपात आणण्याची मूळ संकल्पना या अॅपचे निर्माते संदीप केळकर यांची. गेले वर्षभर ते या संकल्पनेवर काम करत आहेत. नितीश बुधकर, संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांची साथ लाभल्यानंतर हा प्रकल्प वेगाने पुढे सरकला. सादरीकरणाची उत्तम हातोटी असलेले मराठीतील नामवंत अभिनेते-अभिनेत्री यांनी गोष्टींचं केलेलं अभिवाचन, आदित्य ओक या तरुण उमद्या संगीतकाराने गोष्टींतील भावनांना अत्यंत पूरक असं केलेलं साउंड डिझाइन आणि स्वतः उत्तम वाचक असलेल्या संपदा जोगळेकर-कुलकर्णीचं कुशल दिग्दर्शन यामुळे गोष्टोriesचं हे अवघड शिवधनुष्य उचलणं शक्य झाल्याचं संदीप केळकर यांनी सांगितलं.

विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, मंगला गोडबोले, शं. ना. नवरे, द. मा. मिरासदार, विद्याधर पुंडलिक, प्रिया तेंडुलकर, संपदा जोगळेकर-कुळकर्णी आदी नामवंत लेखकांच्या कथांचं अभिवाचन अतुल कुलकर्णी, जीतेंद्र जोशी, स्पृहा जोशी, ऐश्वर्या नारकर, ललित प्रभाकर, रोहन गुजर यांनी केलं आहे.

या माध्यमाद्वारे मराठी कथा कथाकथनाच्या आविष्कारात पुन्हा जगभर पोहोचेल आणि गोष्टीवेल्हाळ मराठी भाषाप्रेमींना पुन्हा “गोष्टींचा” आनंद लुटता येईल, असा विश्वास संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s