लॉर्ड ऑफ शिंगणापूर चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा संपन्न


4

धार्मिक सिनेमाची निर्मिती ही अतिशय अभ्यासपूर्ण असावी लागते. असाच एक अभ्यासपूर्ण तरीही रंजकसिनेमा आणण्याचे धाडस निर्माता-दिग्दर्शक राज राठैाड यांनी केले आहे. लॉर्ड ऑफ शिंगणापूर हा शनि महात्म्यावर आधारित चित्रपट घेऊन ते येत असून, या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच एका धमाकेदार सोहळ्यात संपन्न झाला. राज राठैाड निर्मित व लिखित दिग्दर्शित लॉर्ड ऑफ शिंगणापूर हा सशक्त कथानकाचा आणि वेगळ्या विषयाची मांडणी असलेला चित्रपट प्रेक्षकांसाठी भक्तिमय अनुभूती ठरणार आहे.

या म्युझिक लाँच प्रसंगी प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग, चित्रपटातील कलाकार वर्षा उसगांवकर, राहुल महाजन, आशुतोष कुलकर्णी, मिलिंद जोशी, सिनेमोटोग्राफर प्रशांत जाधव, संकलक – पटकथाकार- पोस्ट प्रोडकशन हेड अजित देवळे, चित्रपटाची सर्व टीम व शनी शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त तसेच त्यांचे सहकारी आवर्जून उपस्थित होते. ‘गेल्या पाच वर्षापासून शनि महात्म्यावर चित्रपट निर्मिती करण्याची माझी इच्छा होती ती आज साकार झाली याचा आनंद आहे’, असे भावोद्गार निर्माता-दिग्दर्शक राज राठैाड यांनी याप्रसंगी काढले.

‘बाली उमर’, ‘निलांजन समाभास’, ‘देवा शनि देवा’, ‘ही दुनिया रे’, ‘तू माझी आशिकी’ ही पाच श्रवणीय गीते या चित्रपटात आहेत. फारुख बरेलवी यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीतांना बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर,रूपकुमार राठैाड, साधना सरगम, जावेद अली, सुखविंदर सिंग, रवींद्र साठे, वैभव वशिष्ठ या दिग्गज गायकांचा स्वरसाज लाभला आहे. फराहन शेख यांनी ही गीते संगीतबद्ध केली असून पार्श्वसंगीत मोन्टी शर्मा यांचं आहे. या सर्व गीतांच नृत्यदिग्दर्शन लोलीपॅाप यांनी केलं आहे.

‘शनि देव हे शीघ्रकोपी’ अशी भक्तांची धारणा असते मात्र राज राठैाड यांनी शनि देवाचे एक वेगळं सकारात्मक रूप लॉर्ड ऑफ शिंगणापूरच्या निमित्ताने भक्तांच्या समोर आणलं आहे. शनि देवाचं हे रूप भक्तांना आत्मविश्वास आणि सामर्थ्य देणारं आहे. या चित्रपटात शनिदेवाची भूमिका अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी साकारली असून सुधीर दळवी, मनोज जोशी, वर्षा उसगांवकर, राहुल महाजन, आशुतोष कुलकर्णी,पंकज विष्णू, अनिकेत केळकर, मिलिंद जोशी, दीपक शर्मा, कांचन पगारे, वैभवी, ब्रजेश हिरजी, यशोधन राणा,यश चौहान, अॅड.वैभव बागडे, सागर पंचाल, शिशी गिरी, मनमौजी आकाश भारद्वाज, अॅण्ड्रीया अशी कलाकारांची तगडी फैाज यात आहे. या चित्रपटाच खास आकर्षण म्हणजे हिंदीतील प्रख्यात गायक सुखविंदर सिंग यांनी ‘देवा शनि देवा’ हे गीत गायलं असून हे गीत सुखविंदर सिंह यांच्यावरच चित्रित करण्यात आलं आहे. हिंदीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर अभिनेता राहुल महाजन लॉर्ड ऑफ शिंगणापूरचित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीत पदार्पण करणार आहेत.

२००३ साली सुरु झालेला राठैाड फिल्म्स प्रोडक्शनचा मनोरंजन क्षेत्रातला प्रवास हा दखल घेण्याजोगा आहे. राठैाड कॅसेट प्रा. लि च्या माध्यमातून ५०० हून अधिक भक्तीमय अल्बमची निर्मिती आजवर करण्यात आलीआहे. लॉर्ड ऑफ शिंगणापूर  ही त्यांची पहिलीच मराठी चित्रपट निर्मिती असून राठैाड फिल्म्स प्रोडक्शन तर्फे आगामी काळात प्रेक्षकांना आवडतील अशा चित्रपटांच्या निर्मितीचा राज राठैाड यांचा मानस आहे. लवकरच प्रदर्शित होणारा लॉर्ड ऑफ शिंगणापूर हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास राज राठैाड यांनी व्यक्त केला.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s