डबल सीट झी टॉकीज वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर अमित आणि मंजिरीच्या स्वप्नांची रंजक कहाणी


jgfj

 

सतत धावणारं शहर अशी या मुंबईची ओळख. पण हे शहर कशामागे धावतं? असा प्रश्न विचारलं तर एकच उत्तर मिळेल…स्वप्नांच्या मागे! इथे जणू स्वप्नांची एक स्पर्धाच चाललेली असते. स्वप्नांचा हा प्रवास या शहरात दिवस-रात्र अविरत चालत असतो. कधी तो एकट्याचा असतो तर कधी कुणाला सोबत घेऊन. अमित आणि मंजिरी या  दोघांनी पाहिलेल्या अशाच स्वप्नांची आणि त्यांच्या अनोख्या प्रवासाची गोष्ट लवकरच झी टॉकीजवर पहायला मिळणार आहे. झी टॉकीजवर ८ नोव्हेंबरला दुपारी १२ वा. आणि संध्याकाळी ६ वा. डबल सीट चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर प्रसारित केला जाणार आहे.

झी टॉकीजवर दाखवल्या जाणाऱ्या डबल सीटच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरविषयी अंकुश आणि मुक्ता हे दोघंही उत्सुक आहेत. चित्रपटगृहात प्रेक्षकांनी जो भरभरून प्रतिसाद दिला तो अविस्मणीय होताच, आताझी टॉकीजच्या माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांशी आणखी जवळचं नातं निर्माण होईल आणि घराचं स्वप्न आता प्रत्येक घराघरात जाईल याचा आनंद मुक्ता बर्वे यांनी व्यक्त केला तर हा प्रवास जितका आम्ही एन्जॉय केला तितकाच तो प्रवास प्रेक्षकसुद्धा एन्जॉय करतील असा विश्वास अंकुश चौधरीने व्यक्त केला.

स्वप्नांचा डबल सीट प्रवास करणारे अमित आणि मंजिरी यांनी स्वप्नपूर्ततेसाठी घेतलेली उडी प्रत्येकाला बळ देणारी आहे. झी टॉकीजवर दाखवण्यात येणाऱ्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरसाठी नुकतंच प्रोमो शूट करण्यात आलं. या शूटच्यावेळी अंकुश आणि मुक्ता यांनी डबल सीटचा नॅास्टॅल्जिक अनुभव पुन्हा घेतला. रसिकांची मने जिंकत मोठा पडदा गाजवणारा डबल सीट आता छोट्या पडद्यावर येत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला सज्ज झाला आहे.

डबल सीट चित्रपटात अंकुश चौधरी, मुक्ता बर्वे यांच्यासोबत विद्याधर जोशी, वंदना गुप्ते, शुभंकर तावडे,संदीप पाठक, आसावरी जोशी आणि पुष्कर श्रोत्री या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अमित आणि मंजिरी यांच्या स्वप्नांची ही कहाणी झी टॉकीजवर ८ नोव्हेंबरला दुपारी १२ वा. वाआणि संध्याकाळी ६ वा.अवश्य पहा.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s