सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते ‘कौल मनाचा’ चित्रपटाचा मुहूर्त


hfghfg
मराठी रुपेरी पडद्यावर वैविध्यपूर्ण चित्रपटांची प्रभावी निर्मिती सातत्याने होत आहे. मानवीकंगोऱ्याचं दर्शन घडवत नातेसंबधाचा अर्थ उलगडून दाखवणारा सदिच्छा फिल्म्स प्रस्तुतकौल मनाचा हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजेश पाटील निर्मित, भिमराव मुडे दिग्दर्शित कौल मनाचा या चित्रपटाचा मुहूर्त प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते नुकताच मुंबईत संपन्न झाला. मेकअपमन ते निर्माता अशी राजेश पाटलांची झेप नक्कीच कौतुकास्पद आहे, असं सांगत सोनाली बेंद्रे यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. या मुहूर्तप्रसंगी चित्रपटाला शुभेच्छा द्यायला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर चित्रपटातील कलाकार  तंत्रज्ञ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
भिमराव मुडे यांचा स्वतंत्र दिग्दर्शनातला हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाची कथाभिमराव मुडे व श्वेता पेंडसे यांची असून मानवी मनाच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. या चित्रपटाची गीते मनोज यादव यांनी लिहिली असून संगीत रोहन-रोहन यांचं आहे. नितीन घाग यांनी छायाचित्रणाची व संतोष यादव यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. वेशभूषा नितीन भावसार व कलादिग्दर्शन संजीव राणे यांच आहे.
कौल मनाचा या चित्रपटात राजेश शृंगारपुरे, समीर धर्माधिकारी, अमृता पत्की, विजय गोखले, विजय चव्हाण, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, श्वेता पेंडसे, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवळकर, जयराज नायर, विनीत भोंडे, अभय राणे ह्या कलाकारांसोबत आशुतोष गायकवाड, गणेश सोनावणे, लव विसपुते, गिरीजा प्रभू, निनाद तांबडे या बालकलाकारांच्या भूमिकासुद्धा आहेत.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s