‘बाय गो बाय’ ४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला


FR2A6082

आर. एस. सिनेव्हिजन निर्मित बाय गो बाय या चित्रपटातून स्त्रीप्रधान संस्कृतीची धमाल प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.  निर्मिती सावंत, विजय पाटकर, नयन जाधव, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर अशी उत्तम स्टारकास्ट असलेला हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘बाय गो बाय’ ही गोष्ट आहे नायकांची वाडी या गावातील बायजाची. नायकांच्या वाडीला बायजा बायकांची वाडी करून टाकते. या गावातील महिला सर्व अधिकार आपल्या हाती घेतात आणि पुरुषांचे स्थान पाळीव प्राण्यांसारखे होऊन जाते. बायजाक्काच्या म्हणण्यानुसारच, गाव वागत असते. पुरुषांनी मिशा वाढवायच्या नाहीत, घरातील कामे करायची असे फर्मानच काढले जाते. इतकेच काय, गावात बाळाचा जन्मही होत नाही. थोडक्यात बायजाक्का पुरुषांवर एकप्रकारे सूडच घेत असते. पण का ? हे चित्र बदलतं का? आणि कसं? या प्रश्नांची उत्तरं मोठ्या पडद्यावरच पहायला मिळतील.
आर. एस. सिनेव्हिजनच्या प्रदीप कचेर पाटील व नरेश गणपत ठाकूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन विजय पगारे यांनी केले आहे. सुरेश देशमाने यांनी छायालेखन केले आहे. सुबोध फाटक व सुबोध पवार यांच्या गीतांना विजय गटलेवार यांनी संगीतबद्ध केले आहे. परेश मांजरेकर यांनी संकलन, सलील अमृते यांनी पार्श्वसंगीत, नरेंद्र भगत व विशाल सावंत यांनी कला दिग्दर्शन, मीलन देसाई यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. तर, मयूर वैद्य, राजेश बिडवे, संतोष भांगरे यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे.
चित्रपटात निर्मिती सावंत, विजय पाटकर, नयन जाधव, शशिकांत केरकर, शीतल फाटक, जयवंत भालेकर,  पूर्णिमा अहिरे केंडे, प्रशांत चौडप्पा, पूनम खैर, दीपक आलेगावकर, कृतिका तुळसकर, परी पिंपळे, मयूर पवार आदींच्या भूमिका आहेत.
दिग्दर्शक म्हणून ‘बाय गो बाय’ हा विजय पगारे यांचा पहिलाच चित्रपट आहे. बरीच वर्षे नाटक- चित्रपट क्षेत्रात काम केल्यावर कधीतरी स्वत:  चित्रपट दिग्दर्शित करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. ‘बाय गो बाय’मुळे ते प्रत्यक्षात आले. स्त्री पुरुष समानता हवी असे फक्त बोलले जाते. मात्र, ही प्रत्यक्षातही यायला हवी. कोणावरही अन्याय झाला, तर त्याचे परिणामही अन्यायकारक होतात. असे भाष्य या चित्रपटात विनोदी पद्धतीनं करण्यात आलं आहे. प्रासंगिक विनोद हे या चित्रपटाचं बलस्थान आहे,’ असे पगारे यांनी सांगितले.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s