पुष्करचं अनोखं ‘समाजकार्य’


trhtrh
 
विनोदाच्या अचूक टायमिंगने धमाल उडविणाऱ्या पुष्करने केलेलं समाजकार्य सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. पुष्करने हे समाजकार्य उद्दात हेतूने केलं असलं तरी त्यामुळे तोचांगलाच अडचणीत सापडला आहे. निरागस पुष्करच्या या अडचणीला तीन बायका जबाबदार आहेत. अर्थातच पुष्करचं हे समाजकार्य आगामी कॅरी ऑन देशपांडे  या मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे.
 
देशपांडे नामक एका सरळ व साध्या माणसाची भूमिका पुष्करने यात साकारली आहे.‘समाजरीत’ म्हणून त्याचे पहिले लग्न झालेले असते आणि दुसरे लग्न समाजकार्य म्हणून होते. एका मुलीचे लग्न मोडत असताना हा शशी देशपांडे तेथे हजर असतो. तिथे अचानक गंभीर परिस्थिती उद्भभवते. त्या मुलीचा बाप विचारतो, आता माझ्या मुलीशी कोण लग्न करणार..? एवढ्यात देशपांडे म्हणतो मी करणार..! त्यानंतर आणखीन एक मुलगी येते आणिदेशपांडे यांनी याआधी माझ्याशी लग्न केलेले आहे असे सांगते. मग एकच तारांबळ उडते. 
 
या तारांबळीमुळे उडणारी धमाल त्यातून निर्माण होणारा गोंधळ दिग्दर्शक विजय पाटकर यांनी नर्मविनोदी, खुसखुशीत पद्धतीने मांडला आहे. तीन बायकांच्या गोंधळात अडकलेल्या देशपांडे नामक पुरुषाची कर्मकहाणी दाखवताना एका थापेतून उद्भवणाऱ्या समस्येवर उतारा म्हणून दुसरी थाप मारणं, त्यातून नस्तं झेंगट उभं राहिल्यावर तिसरी थाप मारणं, यातून एकामागून एक घोळ निर्माण होतो. हा घोळ प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारा आहे.
 
अथर्व 4 यु रिक्रिएशन अँड मिडिया प्रा लि. प्रस्तुत, गणेश रामदास हजारे निर्मित आणि विजय पाटकर दिग्दर्शित कॅरी ऑन देशपांडे या चित्रपटात पुष्कर श्रोत्री, संजय खापरे, मानसी नाईक,हेमलता बाणे, सागर कारंडे, जयवंत वाडकर, विजय कदम, सविता मालपेकर, सीमा कदम, स्नेहल गोरे या कलावंतांच्या अभिनयाची जुगलबंदी पहायला मिळेल. येत्या ११ डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s