” सावनी अनप्लग्ड पर्व २ “


 

 
जुनी हिंदी-मराठी गीते सुंदररित्या सादर करणारे कलाकार, त्यांना मिळालेली वाद्यवृदांची संगत आणि जोडीला खुमासदार शैलीतील सूत्रसंचालन आणि कलाकारांच्या सादरीकरणाला श्रोत्यांनी  दिलेली उत्स्फूर्त दाद, टाळ्यांचा कडकडाट यामुळं अनेक संध्याकाळ या स्वरमय होतात . पण प्रत्येक वेळा अश्या कार्यक्रमाना प्रत्येक श्रोत्त्याना जात येतच असे नाही . श्रवणीय संगीत तर ऐकायचं  आहे पण वेळे अभावी घराबाहेर पडता येत नसलेल्या श्रोत्यांना घरच्या घरी अगदी संगणकासमोर बसून श्रवणीय गाण्यांचा आनंद देण्यासाठी  ” होणार सून मी या घरची ” मालिकेतील प्रेमगीत ” तू मला मी तुला ” गाणारी  सावनी रविन्द्र आपल्यासाठी ” सावनी अनप्लग्ड  पर्व २ ” घेहून येत आहे . 
 
अनप्लग्ड गाण्यांना मुखत्वे गिटार किंवा कीबोर्ड ने म्युझिक दिल जात .  अनप्लग्ड  म्हणजे प्रोसेसिंग न केलेलं गाणं . या अनप्लग्ड गाण्यांना मुळ गाण्यांपेक्षा आजकाल जास्तच लोकप्रियता मिळू  लागली आहे. म्हणूनच संगीतप्रेमींना काही नवीन देण्याचा फंडा सावनी ने सुरु केलाय . अनप्लग्ड गाण  हे वेगळा बाज देऊन रिलीज केल जात किंवा एखाद दुसरंच वद्य वाजवून गायाल जात . आणि हा वेगळेपणा लोकांना भावतो .” सावनी अनप्लग्ड पर्व १ ” हे इंटरनेट वरील  ओन्ली मराठी एन्टरटेण्टमेंट या युट्युब च्यानल वर भरपूर गाजले आणि सावनीची अनप्लग्ड गाणारी एकमेव गायिका म्हणून एक अनोखी ओळख करून दिली आणि  मराठी चित्रपटसृष्टीत सावनी रवींद्र हि पहिली अनप्लग्ड  गाण्यांची मालिका काढणारी गायिका ठरली .
 
सावनीने पहिल्या पर्वात एकंदर १५ गाण्यांचा संच उपलब्ध करून दिला . त्यात हिंदी मराठी अशी बरीच नावाजलेली आणि प्रेक्षकांनी सुचवलेली गाणी तिच्या सुमधुर आवाजात गायली . त्यात तिची ओळख  निर्माण करणारं  ” तू मला मी तुला ” हे गाण  तर होतच मात्र त्याप्रमाणे इतर अनेक उत्तमोत्तम मराठी आणि हिंदी गाणी , बगळ्याची माळ फुले , चांदण्या  रात्रीतले स्वप्न तू विसरून जा , पासून जाने तू या जाने ना , युं हसरातोंके डाग आणि त्या पुढे जाऊन  ए आर रहमान याचं ड्रीम्स ऑन फायर सारखी गाणीही गायली . 
 
आता येत्या ६ डिसेंबर पासून सावनी रसिकांसाठी ” सावनी अनप्लग्ड पर्व २ ” घेऊन येत आहे . ज्यात तिने अजूनही सुंदर सुंदर गाणी गायली आहेत . श्रोते या पर्वाचाही तेवढाच आनंद  घेतील अशी सावनीला खात्री आहे . पहिली काही  गाणी नवोदित संगीतकार रिषभ शाह याने संगीतबद्ध केली आहेत . तर देवेश कामत आणि अजिंक्य कुलकर्णी या नवोदित दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केली आहेत . तर गाण्याचे DOP आहेत श्रीचीत विजयन आणि राजीव ब्रिट्टो . हि सर्व अनप्लग्ड  गाणी इंटरनेट वर ओन्ली मराठी एन्टरटेण्टमेंट  ( ONLY MARATHI ENTERTAINMENT ) या युट्युब च्यानल वर ६ डिसेंबर पासून उपलब्ध होतील.
 
या अनप्लग्ड गाण्याची  एक झलक सर्व रसिकांसाठी इथे  देत आहोत .
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s