पाटणा पायरेट्सचा विजयी रथ तेलुगु टायटन्स रोखणार


कोलकाता , दि. 7 ः  उत्तम आक्रमण आणि भक्कम बचावाच्या जोरावर  माजी विजेता जयपूर पिंक पँथर्स , गतविजेता यू मुंबा, बेंगलुरू बुल्स या बलाढ्य संघांना पराभूत करून खळबळ उडवून देणार्‍या पाटणा पायरेट्सची लढत सध्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर असलेल्या तेलुगू टायटन्स संघाशी होणार आहे. दोन तुल्यबळ संघात होणारी ही लढत रंगतदार होईल. पाटणा पायरेट्सचा विजयी रथ तेलुगु टायटन्स रोखतोय का याबाबत उत्सुकता आहे.

स्टार स्पोर्टस् प्रो कबड्डी स्पर्धेच्या तिसर्‍या हंगामात पाटणा पायरेट्स तीन सामने खेळला आहे. या संघाने सुरूवातीचे सलग तीन सामने जिंकून  विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. तीन सामने जिंकून पाटणा पायरेट्सने 15 गुणांची कमाई केली आहे. दुसरी कडे तेलुगू टायटन्सने 5सामन्यांपैकी 3  सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर या संघाने आपला खेळ सुधारला आहे.  तेलुगू टायटन्स संघ  चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे या लढतीकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

संदीप नरवालच्या नेतृत्वाखाली खेळणारा पाटणा पायरेट्सचे सर्वच खेळाडू चांगल्या फॉर्मात आहेत. संदीप नरवाल वगळता मोठे नाव नसलेला एकही खेळाडू या संघात नाही. परंतु सांघिक कामगिरीच्या जोरावर या संघाने दिग्गजांना धूळ चारली आहे. गुरविंदर सिंग, दीपक नरवाल, रवी दलाल  हे आक्रमणाची बाजू उत्तमपणे सांभाळत आहेत. राजेश मंडलला देखील सुर गवसला आहे.

दुसरीकडे तेलुगू टायटन्सचे  राहूल चौधरी, सुकेश हेगडे , धनराज चेरलाथन, मिराज शेख ,प्रशांत राय ही चौकडी आक्रमणाची बाजू समर्थपणे सांभाळत आहेत. पहिल्या पराभवानंतर या खेळाडूंनी आपल्या चुका सुधारल्या आहेत. जयपूर पिंक पँथर्सला पराभूत केल्यामुळे या संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे हा संघ पाटणा पायरेट्सला चांगली टक्कर देईल अशी अपेक्षा आहे.

बेंगाल वॉरियर्स आणि दबंग दिल्ली यांच्यात होणार्‍या सामन्यात बेंगाल वॉरियर्सचे पारडे जड वाटते. दबंग दिल्लीने या मोसमातील चारही सामने गमावलेले आहेत. तर बेंगाल वॉरियर्सने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत.  आपल्या भक्कम बचावाच्या जोरावर बेंगाल वॉरियर्सने पहिल्या दोन लढतींमध्ये  तेलुगू टायटन्स आणि बेंगलुरू बुल्स यांना  पराभूत करून चांगली सुरूवात केली. बेंगाल वॉरियर्सच्या निलेश शिंदे, गिरीश एरनाक ,बाजिराव होडगे या त्रिकूटाने भल्याभल्यांना रोखले आहे. त्यांचे  जँग कून ली , महेंद्रन जगताप हे चढाईपटू चांगली कामगिरी करत आहेत. दिल्लीचे काशिलिंग अडके, अमित चिल्लर, रोहित चौधरी यांना अद्यापही सुर गवसलेला नाही .

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s