भव्य आरोग्य तपासणी शिबिराला विक्रमी प्रतिसाद


_DSC7905

मुंबई, दि.2९ (प्रतिनिधी)-

मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर्स, अनेक प्रकारच्या तपासण्या, लगेचच त्या तपासण्यांचे अहवाल आणि त्यानुसार डॉक्टरांनी दिलेले औषधं तीसुद्धा मोफत…हे चित्र होतं आर.के.एचआयव्ही एडस् रिसर्च सेंटर आणि ताराबाई बडगुजर फाऊंडेशनतर्फे आयोजित भव्य आरोग्य तपासणी शिबिराचं… मुंबईतील सांताकूझ पश्चिमेला जुहू तारा रोडवरील बीएसएनएल मैदानावर हे भव्य शिबिर भरवण्यात आलं होतं. हजारो डॉक्टर्स आणि स्वयंसेवकांच्या सहाय्याने इथं आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली. या भव्य शिबिराला नागरिकांनीही विक्रमी प्रतिसाद दिला. या शिबिराचं उद्घाटन केंद्रिय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आलं. तर यावेळी केंद्रीय राज्यमंत्री निहालचंद मेघवाल हेसुद्धा उपस्थित होते. अशाप्रकारच्या शिबिरांमधून गरजू रुग्णांना फायदा मिळतो तसंच देशात खूप दाते आहेत आणि ते चांगल्या संस्थांच्या माध्यमातून असे समाजोपयोगी कामं करतात हे खूप समाधानाची बाब आहे असं मत अनंत गीते यांनी व्यक्त केलं. तर अशाप्रकारचं भव्य शिबिर संस्थेने देशात कुठेही भरवलं तर त्यांना मदत करु असं केंद्रीय राज्यमंत्री निहालचंद मेघवाल यांनी सांगितलं.

या तपासणीमधून ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांच्यासाठी मुंबईतल्या ५१ रुग्णालयांशी संपर्क साधून मोफत शस्त्रक्रियेची सोय करण्यात आल्याची माहिती आर.के.एचआयव्ही रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र कुमार यांनी दिली आहे. तर या शिबिराला राज्याच्या कानाकोपऱ्यातूनही लोक आले होते, त्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त शिबिरं आयोजित करुन जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याचा निर्धार या शिबिराचे आयोजक आणि ताराबाई फाऊंडेशनचे अजय बडगुजर यांनी व्यक्त केला. आजारांवर मात करण्यासाठी आजही अनेक रूग्णं पारंपारिक अर्थातच आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब करतात. अशाच पद्धती या शिबीरातही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. शिबीरात योगविद्याचेही केंद्र उभारण्यात आले होते. तसंच मोफत दंतचिकित्साही केली गेली. त्याचबरोबर डोळ्यांच्या तपासणीनंतर रुग्णांना मोफत चष्मे वाटले गेले.

या शिबिराला अनेक राजकारणी आणि अभिनेत्यांनीही हजेरी लावली होती. अभिनेता मुकेश ऋषी, रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर यांच्यासह काही सिनेकलाकारांनीही या शिबिराला भेट देऊन आयोजकांचं अभिनंदन केलं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s