राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांना डी. लिट पदवी प्रदान


HREDH

इंदोरचे उदयसिंग ऊर्फ राष्ट्रसंत भय्यूजी महाराज त्यांच्या सामजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली.विद्यापीठाच्या चौथ्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कुलपती  डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा चौथा दीक्षांतसमारंभ बुधवारी पार पडला. या पदवीदान समारंभात पाच स्नातकांना पीएचडीसह एकूण २१० विद्यार्थ्यांना पदव्या व पदव्युत्तर पदव्या प्रदान केल्या तसेच सुवर्णपदकही बहाल करण्यात आले.

राष्ट्रसंत भय्यूजी महाराज इंदोर येथील श्री दत्त सद्गुरू धार्मिक व पारमार्थिक ट्रस्टचे अध्यक्षअसून धर्म, नेतृत्व गुण, मानवता, समाज जागृती, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि विकास,व्यवस्थापन अशा विषयांवर मार्गदर्शन अनेक सामाजिक संस्थांची स्थापना,पारधी समाज आदिवासी धर्मशाळा, संविधानिक जागरण अभियान, तुरुंगवासीयांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण रथ, कृषितीर्थ योजना, समृद्ध गाव योजना यासाठी कार्यरत आहेत.त्यांच्या या कार्याचा गौरवार्थ राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांना डी. लिट पदवी देण्यात आली.

यावेळी बोलताना राष्ट्रसंत भय्यूजी महाराज म्हणाले की, हा सन्मान माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. आपल्या कार्याची माहिती यावेळी राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी दिली. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. के एन गणेश, जे.सी.बोस फेलो, माजी मंत्री सतेज पाटील, विद्यापीठ चे अद्यक्ष डॉ संजय.डी पाटील, गायिका  अनुराधा पौडवाल आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s