प्रशांत दामलेंचे जोरदार कमबॅक


fsfaf

शीर्षकापासून आपलं वेगळंपण अधोरेखित करणाऱ्या, प्रशांत दामले यांच्या मध्यवर्ती भूमिकेमुळे अनोख्या विषयाच्या भो भो या सिनेमाविषयी प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता लागून राहिली होती. प्रशांत दामलें सारखे हरहुन्नरी कलाकार जे इतके वर्षे सिनेमापासून लांब होते त्यांना घेऊन दिग्दर्शक भरत गायकवाड यांनी वेगळ्या धाटणीचा सिनेमा आणत प्रेक्षकांना अनोखी मेजवानी दिली.

या मेजवानीच जोरदार स्वागत करत प्रेक्षकांनी भो भो ला उदंड प्रतिसाद द्यायला सुरवात केली आहे. भो भो ची सिनेमागृहात यशस्वी वाटचाल सुरु आहे. प्रशांत दामलेंच्या फॅनसाठी ही अनोखी ट्रीट ठरत आहे. त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाद्वारे गुप्तहेर व्यंकटेश भोंडेच्या भूमिकेत कमाल करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. इतर कलाकारांची तितकीच दमदार साथ प्रशांत दामले यांना मिळाली आहे. एकंदरीतचं पहिल्या तीन दिवसात भो भो ला मिळालेला दमदार प्रतिसाद पाहता प्रशांत दामले यांनी केलेलं कमबॅक यशस्वी ठरलं आहे असं निश्चितचं म्हणावं लागेल.

‘सुमुखेश फिल्म्स’ प्रस्तुत आणि भरत गायकवाड निर्मित-दिग्दर्शित भो भो  यासस्पेन्स थ्रिलर सिनेमात प्रशांत दामले यांच्यासोबत सुबोध भावे, संजय मोने,शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, सौरभ गोखले, अनुजा साठे, किशोर चौगुले, राजन भिसे, शैलेश दातार, उदय नेने, प्रमोद पवार, समीर विजयन, केतकी चितळे, माधव अभ्यंकर, वंदना वाकनीस, प्रदीप पटवर्धन अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s