वैभव पूजाची LOVE एक्सप्रेस अथर्व ४ यु मिडिया अॅण्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि.ची दुसरी चित्रपट निर्मिती


fdhbfdhb 
रुपेरी पडद्यावर तरुण पिढीला अपील होतील अशा चित्रपटांची निर्मिती सातत्यानेहोऊ लागली आहे. ‘अथर्व ४ यु मिडिया अॅण्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’ ही चित्रपट निर्मिती संस्था LOVE एक्सप्रेस हा प्रेमपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. नुकत्याच एका शानदार सोहळ्यात या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.
 
प्रेमकथा नेहमीच सिनेमाच्या जान राहिल्या आहेत. प्रेमपटाला प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘LOVE एक्सप्रेस मध्ये सहवासातून खुलणाऱ्या प्रेमाची अनोखी कहाणी साकारली जाणार आहे.‘कॅरी ऑन देशपांडे’ या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर ‘अथर्व ४ यु मिडिया अॅण्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’ची LOVEएक्सप्रेस ही दुसरी चित्रपट निर्मिती आहे. वैभव तत्ववादी व पूजा सावंत ही फ्रेश जोडी LOVE एक्सप्रेसच्या निमित्ताने एकत्र झळकणार असून ‘दगडी चाळ’ फेम दिग्दर्शक चंद्रकांत कणसे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
 
या चित्रपटाचे लेखन संजय जमखंडी यांचं असून चित्रपटाला चिनार-महेश यांच संगीत लाभलं आहे. या प्रेमकथेचा अनोखा पैलू प्रेक्षकांना निश्चितच भावेल असा विश्वास निर्माते गणेश हजारे यांनी व्यक्त केला. येत्या २५ मे पासूनLOVEएक्सप्रेसच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s