मधु इथे अन चंद्र तिथे टीमची खवय्येगिरी


 

trhtrh

खवय्येगिरी चा बेत आखत मधु इथे अन चंद्र तिथे या आगामी मराठी चित्रपटाची टीम झी मराठीच्या आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात खमंग मेजवानीचा आस्वाद घेत २ फक्कड पदार्थ खास रसिक प्रेक्षकांसाठी बनवणार आहेत. १२ जूनला हा सिनेमा येणार आहे. आपल्या विनोदी अंदाजाने रसिकांना खळखळून हसायला लावणाऱ्या विशाखा सुभेदार व शैला काणेकर या दोन अभिनेत्रींनी फ्रँकी व मेयोनीज सॅण्डविज हे दोन चवदार पदार्थ बनवले. या पदार्थांचा फडशा पाडत या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा साकारणारे ऋतुराज फडके, शाश्वती पिंपळीकर यांनीही या पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी या चित्रपटातील या चारही कलाकारांनी एक छोटेखानी स्कीट सादर केलं. निवेदक संकर्षण कऱ्हाडे याच्या निवेदनाची धमाल व मधु इथे अन चंद्र तिथे टीमच्या कलाकारांची कमाल असा धमाल मस्तीत रंगलेला हा भाग मंगळवार ७ जून व शनिवार ११ जून ला दुपारी १.३० वा. प्रेक्षकांना पहाता येईल.

 

‘चित्रपंढरी’ या बॅनरखाली येणाऱ्या या चित्रपटाचे निर्माते झी टॉकीज व रत्नकांत जगताप  आहेत. दिग्दर्शक संजय झणकर मधु इथे अन चंद्र तिथे या चित्रपटातून एक रंजक कथा आपल्यासमोर उलगडणार आहेत. प्रत्येक शहराची स्वत:ची एक खासियत असते. हीच खासियत घेऊन कोल्हापूर व पुणे हे एकत्र आल्यावर उडणाऱ्या धमाल कथेची मेजवानी म्हणजे मधु इथे अन चंद्र तिथे हा सिनेमा. धमाल, मस्ती, हास्याचे स्फोट घडवत प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी हा सिनेमा देणार आहे. आनंद इंगळे, भाऊ कदम, किशोर चौघुले, शैला काणेकरविशाखा सुभेदार, संजय मोहिते, ऋतुराज फडके, शाश्वती पिंपळीकर अशी विनोदवीरांची फौज यात आहे. १२ जूनला हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s