प्रेम जात पाहून होत नाही- हर्षदा खानविलकर ‘प्रेमाला जात नसते’ स्टार प्रवाहचे ‘पुढचं पाऊल’


img_0766

स्टार प्रवाह वाहिनीवर गाजत असलेल्या ‘पुढचं पाऊल’ या मालिकेने प्रसिद्धीचा उच्चांक गाठला आहे. आजही ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात आवडीने पाहिली जात असल्याची प्रचीती अक्कासाहेब म्हणजेच हर्षदा खानविलकर यांना कोल्हापूरमध्ये आली.  या मालिकेतील ‘प्रेमाला जात नसते’ हा नवा विचार मांडणाऱ्या सत्यजित (अमित खेडेकर) आणि तेजस्विनी (आरती मोरे) यांच्यावर आधारित सुरु असलेल्या कथेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अक्कासाहेब यांनी ‘प्रेमाला जात नसते आणि प्रेमाने जातीपातीची बंधने पुसून टाकता येतात’, असे मत मांडले.
पारंपारिक कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर गेले सहा वर्षे यशस्वीरीत्या सुरु असलेल्या या मालिकेने नवे वळण घेतले आहे. आंतरजातीय प्रेम तसेच विवाहाला विरोध करणाऱ्या आपल्या समाजबहूल परिस्थितीला आव्हान देण्याचे काम अक्कासाहेब यात करताना दिसणार आहेत. याच मुद्द्यावर सत्यजित (अमित खेडेकर) आणि तेजस्विनी (आरती मोरे) या कलाकारांसोबत कोल्हापूरदौऱ्यात नुकत्याच येऊन गेलेल्या हर्षदा खानविलकर यांनी ‘प्रेम’या शब्दांची त्यांची असलेली व्याख्या स्पष्ट केली.
‘पालकांनी आपल्या मुलांच्या प्रेमाला विरोध करण्याआधी काहीवेळ विचार करायला हवा. वेळीच प्रसंगावधान दाखवून निर्णय घेतल्यास भविष्यात चुकीचा निर्णय घेतल्याचे शल्य राहणार नाही. असा सल्ला त्या सर्व पालकांना देतात. त्याचबरोबर ‘ संसार करणे खूप कठीण गोष्ट असते, प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाला ते जमतेच असे नाही. त्यामुळे थोरामोठ्याचे म्हणणे ऐका’ अशी तरुणांची कानउघाडणी देखील त्या करतात. ‘प्रेम’ जात पाहून होत नाही, त्यामुळे प्रेमाला जातीसाठी दुय्यम लेखू नका. आपला हा संदेश प्रसारमाध्यमांनी जास्तीतजास्त लोकांपर्यत पोहोचवावा अशी विनंती त्यांनी पत्रकारांना केली. आपली संस्कृती आणि परंपरा जपतानाच आधुनिक विचारसरणीची कास धरण्याचा संदेश अक्कासाहेब या मालिकेद्वारे  देताना दिसत आहेत.विशेष म्हणजे त्यांचा हा दृष्टीकोन दिवसेंदिवस लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.
एकूणच ‘प्रेमाला जात नसते’ हा विचार स्टार प्रवाहवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित होणाऱ्या ‘पुढचं पाऊल’ या मालिकेच्या माध्यमातून समाजात रुजवला जात आहे.

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा:

स्टार प्रवाह संपर्क :
विक्रांत जोशी 9833135448 vikrant.joshi@startv.com
हितेश आढाव 9769016680 hitesh.adhav@startv.com

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s