सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार


ketki-malpekar

सौंदर्य… स्त्री असो वा पुरुष अगदी साऱ्यांनाच आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. सध्याचा जमाना हा ग्लॅमरचा आहे. नवनवीन फॅशन्स रुजवणाऱ्या ग्लॅमर क्षेत्राचा प्रभाव हा सर्वसामान्य नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळेच ट्रेंडी फॅशन्स लगेच तरुणांमध्ये फेमस होतात. एखाद्या फॅशनची क्रेझ निर्माण झाली की सगळेजण तो ट्रेंड आत्मसात करतात. अशावेळी आपल्याला ते चांगले दिसतील का..? किंवा ती फॅशन आपल्या शरीरयष्टीला कशी शोभून दिसेल… याची अचूक काळजी घेण्यात ब्युटी पार्लर्स सक्षम असतात. असंच एक अद्ययावत ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’ माहीममध्ये लवकरच आपल्या साऱ्यांच्या सेवेस तत्पर असणार आहे. केतकी मालपेकर आणि अमृता राव या दोघींनी मिळून उभारलेले ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’चे उद्घाटन येत्या रविवारी २९ जानेवारीला होणार आहे.

केतकी मालपेकर या सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या कन्या आहेत. आई ग्लॅमर फिल्डमध्ये काम करत असल्यामुळे केतकी यांना लहानपणापासूनच फॅशन दुनियेची जवळून ओळख झाली. २००८ मध्ये त्यांनी उदय टक्के यांच्याकडून हेअर ड्रेसिंगचे तांत्रिक ज्ञान शिकून घेतले. सतत बदलणाऱ्या या ग्लॅमवर्ल्डमध्ये स्वबळावर काहीतरी करून दाखवावं ही त्यांची मनीषा आता लवकरच ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’च्या स्वरुपात पूर्ण होणार आहे. तर दूरदर्शनमध्ये गेली २४ वर्ष न्यूज रिडर म्हणून कार्यरत असणाऱ्या  अमृता राव याही ‘सील्व्हेट हेअर अँड ब्युटी बार’चा एक मुख्य भाग आहेत. एम.एस.सी,एल.एल.बी अमृता राव या ‘राव ग्रुप ऑफ केमिकल्स कंपनीज्’च्या डायरेक्टर आहेत. मुळातच शिक्षण आणि कलांची आवड असलेल्या अमृता राव यांनी मराठी चित्रपटसृष्टीत उत्तोमोत्तम कलाकृती दिल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी ७ चित्रपटांची निर्मिती केली असून ‘मानिनी’,‘आरोही’ यांसारख्या चित्रपटांतून स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि स्त्री भ्रूण हत्येविरोधात त्यांनी आवाज उठवत मोलाचा संदेश समाजाला दिला. त्याशिवाय अमृता राव या बरेच वर्षे विविध मराठी चित्रपट पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणून ही काम पाहत आहेत.  

अमृता राव आणि केतकी मालपेकर यांच्या ब्युटी बार मध्ये तुम्हाला सगळ्या ट्रिटमेंट्सचा एकाचवेळी उपभोग घेता येईल. हेअर ड्रेसिंग, हेअर कलरिंग याचबरोबर अलीकडे तरुणींमध्ये प्रचंड क्रेझ असणारी नेल्स आर्ट, नेल्स एक्स्टेंशन यांसारख्या ट्रिटमेंट्सचा ही फायदा तुम्हाला ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’ मध्ये घेता येईल. या येथील नवनवीन टेक्निक्स आणि उत्तम टेक्निशियन्सच्या साथीने तुम्ही अधिकाधिक सुंदर दिसू शकता पण त्यासाठी तुम्हाला एकदा तरी ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’ला भेट द्यावी लागेल.

संपर्कासाठी :   केतकी मालपेकर – ९९३०१९१०७२    अमृता राव – ९८२१०१२६९२

 

सिल्वूएट हेअर अँड ब्युटी बार :

१४-प्लॉट नो. ३३३, कार्ड मेन्शन, शीतलादेवी रोड, युनियन बँक जवळ, माहीम, मुंबई-१६

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s