नगरसेवक एक नायक


bdfbdf.jpg

सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहताहेत. कोणाची सत्ता येणार? आणि कोण बाजी मारणार? यात चुरस पहायला मिळतेय. लोकशाही ही लोकहिताची न राहता ती जेव्हा सत्ताधीशांच्या हिताची ठरते. तेव्हा त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी याच लोकांमधला एक नायक पुढे यावा लागतो… तो म्हणजे नगरसेवक. राजकारण व समाजकारणाच्या तराजूत जनतेचे हित जपणारा नगरसेवक फार कमी वेळा चित्रपटाच्या कथांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. याच धर्तीवर ‘जश पिक्चर्स’ प्रस्तुत आगामी ‘नगरसेवक एक नायक’ हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित ‘नगरसेवक’ या चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक कदम यांनी केलंय. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल, तत्पूर्वी चित्रपटातील गीतांच्या ध्वनिफितीचे शानदार प्रकाशन सुप्रसिद्ध संगीतकार दिलीप सेन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चित्रपटातील कलाकार- तंत्रज्ञांच्या सोबत विजय पाटकर, सुशांत शेलार, हेमलता बाणे, विनोद कुमार बरई व चंद्रशेखर सांडवे हे देखील आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी  चित्रपटाच्या संगीतासोबतच डिजीटल पोस्टर व ट्रेलर लाँच ही करण्यात आले. झी म्युझिकने ‘नगरसेवक’ चित्रपटाची ध्वनिफीत प्रकाशित केली आहे. यातील चार वेगळ्या शैलीतील गीते गीतकार बिपीन धायगुडे, अभिजित कुलकर्णी व विनायक येरापाल्ले यांनी लिहिली असून ती संगीतकार देव आशिष यांनी संगीतबद्ध केली आहेत. सुप्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला व बेला शेंडे यांनी यातील प्रेमगीत गायले असून आनंद शिंदे व आदर्श शिंदे यांनी हळदी गीत गायले आहेत. शीर्षक गीत कविता निकम, राजा हसन व देव चौहान यांनी गायले असून कविता निकम व देव चौहान यांच्या आवाजात आयटम सॉंग ऐकायला मिळणार आहे.

‘नगरसेवक’ या चित्रपटात अन्याय व अत्याचाराविरोधात आवाज उठविणाऱ्या मल्हार या तरुणाची कथा पहायला मिळणार आहे. मुंबईत नव्याने दाखल झालेल्या मल्हारचा अनपेक्षितपणे राजकारण्याशी संबंध येतो. पुढे अशा काही घटना घडतात की तोच निवडणुकीच्या रिंगणात उभा राहतो. व्यावसायिक धाटणीच्या या चित्रपटाची कथा बिपीन धायगुडे यांनी लिहिली आहे. पटकथा बिपीन धायगुडे व अभिजित कुलकर्णी यांनी लिहिली असून संवाद त्यांच्यासोबत योगेश मार्कंडे यांनी लिहिलेत. त्रिलोकी चौधरी यांनी छायांकन केले असून संकलन सुबोध नारकर तर कला दिग्दर्शन मधु कांबळे यांनी केले आहे.

उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, विनय आपटे, सतीश तारे, सुनील तावडे, संजय खापरे, विजय निकम, श्याम ठोंबरे, सविता मालपेकर, त्रियोग मंत्री, प्रियांका नागरे, अभिजीत कुलकर्णी, अशोक पावडे, यश कदम, वर्षा दांदळे, मयुरी देशमुख या कलाकारांच्या अभिनयातून साकारलेला ‘नगरसेवक’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s