राजा चा मुहूर्त


f

मराठी चित्रपटाच्या बदलत्या परिभाषेने रुपेरी पडदा अधिक विस्तारु लागला आहे. मराठी सिनेमा आशय–विषय तसेच सुमधुर गाण्यांमुळे आज ओळखला जाऊ लागला आहे. आपल्या गायकीने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केलेल्या गायक सुखविंदर सिंग यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्याने नुकताच राजा या मराठी चित्रपटाचा मुहूर्त  उत्साहात संपन्न झाला. ‘सत्यसाई मल्टीमिडीया प्रा.लि’ या चित्रपट निर्मिती संस्थेचे निर्माते प्रवीण काकड यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून सहनिर्मिती नरेश साखरे यांची आहे. या मुहूर्त प्रसंगी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, डॉ.अजिंक्य डी.वाय.पाटील (चेअरमन- डी. वाय.पाटील ग्रुप), प्रवीण दराडे (मुख्यमत्र्यांचे सचिव), अतिरिक्त महासंचालक सुरेंद्र पांडे, डॉ. हुज खोराकीवाला (चेअरमन– वोकार्ड ग्रुप), प्रताप दिघावकर (अतिरिक्त पोलिस आयुक्त),रणजीत ढाकणे (महानगरपालिका उपायुक्त), उद्योजक गौरव खाडे, प्रवीण तलरेजा व दिलीप पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

 

‘रातभर… गावभर…  होऊ  दे  बोभाटा  झन झन झनन झनन वाजवू झन्नाटा…’ हे गाणे सुखविंदर सिंग यांनी गायले असून, या गाण्यात स्वतः सुखविंदर सिंग थिरकताना दिसणार आहे. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन संतोष भांगरे यांनी केलं आहे. ‘या गाण्यावर परफॉर्म करताना खूपच मजा आली’ असं सांगत प्रेक्षक हे गाणं नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वास सुखविंदर सिंग यांनी व्यक्त केला.

पॉप सिंगरच्या आयुष्यावर राजा ची कथा बेतली आहे. चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी लिहिली असून संवाद मिलिंद इनामदार व शशिकांत देशपांडे यांनी लिहिले आहेत. वलय मुळगुंद यांच्या लेखणीने सजलेल्या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. सौरदीप कुमार, स्वरदा जोशी, निशिता पुरंदरे, शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, सुरेखा कुडची, विनीत बोंडे, पौरस देशपांडे आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन दामोदर नायडू याचं आहे. निर्मिती व्यवस्थापक पूनम घोरपडे तर कार्यकारी निर्माता सत्यवान गावडे आहेत. वेशभूषा पूर्णिमा ओक यांची असून रंगभूषा शरद सावंत यांनी केली आहे.

 

————————————————————————————-

Muhurat of RAJA

The changing definition of Marathi Films has really enhanced its presence on the Silver Screen. Marathi cinema with its intent and varied content, is also being recognized for its beautiful and pleasant songs. Sukhwinder Singh, who has created a distinct image for himself in Hindi cinema with his style of singing, had a song picturized on him and the muhurat of the movie ‘Raja’ was celebrated with great enthusiasm. Under the Banner of ‘satyasai’ Multimedia Pvt. Ltd’ the film is produced by Pravin Kakad, the Co-producer is Naresh Sakhre. On this occasion, Member of Parliament Dr. Pritam Munde, Dr. Ajinkya D.Y.Patil (Chairman D.Y.Patil Group), Pravin Darade (Secretary to the Chief Minister), Additional Director General Surendra Pande, Dr. H. Khorakhiwala (Chairman Wockhardt Group), Additional Police Commissioner Pratap Dighavkar, Deputy Municipal Commissioner Ranjit Dhakne, Industrialist Gaurav Khade, Pravin Talreja and Dilip Patil, were present.

The song ‘Raatbhar…. gaavbhar….. hovu de bobhaata jan jan janan janan vaajavu jannaata’ is sung by Sukhwinder Singh. Sukhwinder Singh himself will be dancing to this number. The dance has been choreographed by Santosh Bhangre. Sukhwinder said that he enjoyed dancing to this song and expressed his belief that the audience would definitely enjoy this song.

The Movie ‘Raja’ is based on the life of a pop singer. The story and the script is written by director Shashikant Deshpande, dialogues are by Milind Inamdar and Shashikant Deshpande. The songs, penned by Valay Mulgundh, are set to music by Pankaj Padghan. Saurdeep Kumar, Swarada Joshi, Nishita Purandare, Sharad Ponkshe, Jaiwant Wadkar, Surekha Kudchi, Vineet Bonde and Pauras Deshpande have acted in this film. Cinematography is by Damodar Naidu. The production manager is Poonam Ghorpade and the executive producer is Satyavan Gawde. Costumes are by Poornima Oak and make-up is by Sharad Sawant.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s