सागरीका घाटगेचा मराठमोळा डाव


sagrika4

 

‘चक दे इंडिया’ या गाजलेल्या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर आगमन करीत पदार्पणातच लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालेली मराठमोळी अभिनेत्री सागरीका घाटगे पुन्हा एका मराठी चित्रपटामुळे लाइमलाईटमध्ये आली आहे. हिंदीसोबतच मराठीतही अभिनय करणारी सागरीका डाव या आगामी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करीत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’या चित्रपटानंतर डाव हा सागरीकाचा दुसरा मराठी चित्रपट आहे.

 

नितीन उपाध्याय यांनी ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली डावची निर्मिती केली असून, कनिष्क वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या सस्पेंस-थ्रीलरपटाची कथा-पटकथा कनिष्क वर्मा यांनीच लिहिली आहे. संवाद योगेश मार्कंडे यांनी लिहिले आहेत तर मंगेश धाकडे यांचे पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभले आहे. मराठी चित्रपट रसिकांना सायको किलिंगचा अनुभव देणाऱ्या डावमध्ये सागरीकाने मुख्य भूमिका साकारली असून, आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा या चित्रपटातील भूमिका खूपच वेगळी आहे. इतर जॉनरच्या चित्रपटांच्या तुलनेत मराठीमध्ये थ्रीलरपटांची संख्या फार कमी असून, डाव हा चित्रपट त्यांची उणीव नक्की भरून काढणारा असेल असे सागरिका मानते.

 

आशयघन कथानक, अर्थपूर्ण संवादलेखन, सहजसुंदर अभिनय, प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत आणि त्याला साजेसं सादरीकरण या सर्वांचा मिलाफ घडवणाराडाव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s