संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१९ दिमाखात संपन्न


This slideshow requires JavaScript.

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना कलागौरव पुरस्कार

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा विविध स्तरांवरील कलाकृतींना आणि कलावंतांना गौरविणाऱ्या अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत संस्कृती कलादर्पणचा १९ वा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१९ हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झाला. यात ‘दादा एक गुड न्यूज’आहे या नाटकाने तर ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने बाजी मारली. मालिका विभागात ‘छत्रीवाली’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिकेचा मान मिळवला. ‘ए .बी. पी माझा’ वृत्तवाहिनीने सर्वोत्कृष्ट वृत्तवाहिनीचा मान पटकावला.

सोबत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना संस्कृती कलादर्पणच्या सर्वश्रेष्ठ ‘कलागौरव’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. मधुरा देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर या दोघांच्या खुमासदार सूत्रसंचलनाने कार्यक्रमाची रंगत चांगलीच वाढवली. संस्कृती कलादर्पण गौरव सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती.

ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा गौरव करण्यात आला. शाल, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्कारचे स्वरूप आहे या पुरस्काराच्या निमित्ताने आपल्या आजवरच्या प्रवासाला उजाळा देतानाच रोहिणी हट्टंगडी यांनी आपले आई-वडिल, नाट्यक्षेत्रातील गुरु यांच्याविषयीची कृतज्ञता याप्रसंगी व्यक्त केली. राजदत्त यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणे हे माझ्यासाठी निश्चितच आनंददायी असल्याची भावना रोहिणीजींनी व्यक्त केली.

कलावंतांच्या धमाल परफॉर्मन्समुळे हा सोहळा चांगलाच रंगला. गेली १९ वर्षे मनोरंजन विश्वात कार्यरत असणाऱ्या ‘संस्कृती कलादर्पण’च्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या कलावंत, तंत्रज्ञ,प्रसिद्धी माध्यमांचे तसेच प्रेक्षकांचे आभार संस्कृती कलादर्पण संस्थेच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर आणि संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी व्यक्त केले. हा रंगतदार सोहळा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रविवार २३ जूनला दुपारी १:०० वा. व सायंकाळी ७.०० वा. प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१९ च्या या वर्षी नाटक, चित्रपट, मालिका, न्यूज चॅनल्स, रेडिओ या विभागातील मालिका विभाग –

सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) : यशोमन आपटे (फुलपाखरू), समीर धर्माधिकारी (भेटि लागी जीवा)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : ऐतेशा संझगिरी (छोटी मालकीण)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : मिलिंद गवळी ( तू अशी जवळी रहा )

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : सुरेखा कुडची  ( नकळत सारे घडले )

विशेष ज्युरी पुरस्कार घोषित  (मालिका  विभाग) : भेटि लागी जीवा (सोनी मराठी)

लक्षवेधी मालिका : वर्तुळ (झी युवा)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : मंदार देवस्थळी फुलपाखरू (झी युवा)

नाटक  विभाग –

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : शितल तळपदे  (आरण्यक)

सर्वोत्कृष्ट नेपथ्य: प्रदिप मुळ्ये (हॅम्लेट)

सर्वोत्कृष्ट रंगभूषा:  सचिन वारिक (सोयरे सकळ)

सर्वोत्कृष्ट वेशभूषा : प्रदिप मुळ्ये (हॅम्लेट)

सर्वोत्कृष्ट संगीत: राहुल रानडे (हॅम्लेट)

सर्वोत्कृष्ट लेखक: कल्याणी पाठारे (दादा एक गुड न्यूज आहे)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मनवा नाईक (हॅम्लेट)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : आशुतोष गोखले ( सोयरे सकळ )

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : आशिष पवार (गलतीसे मिस्टेक)

लक्षवेधी अभिनेत्री: गौरी इंगवले (ओवी)

विशेष ज्युरी पुरस्कार : सुमित राघवन (हॅम्लेट)

लक्षवेधी नाटक : आरण्यक (अद्वैत थिएटर)

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय नाटक घोषित : (तिला काही सांगायचंय ! )

विशेष ज्युरी पुरस्कार : हॅम्लेट

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (विभागून) : ऐश्वर्या नारकर ( सोयरे सकळ ), ऋता दुर्गुळे  (दादा एक गुड न्यूज आहे)

सर्वोत्कृष्ट अभिनेता: उमेश कामत (दादा एक गुड न्यूज आहे)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अद्वैत दादरकर (दादा एक गुड न्यूज आहे)

चित्रपट विभाग –

सर्वोत्कृष्ट रंगभूषा : सचिन देठे (फर्जंद)

सर्वोत्कृष्ट संकलन  : राहुल भातणकर (आपला माणूस)

सर्वोत्कृष्ट छायांकन : महेश लिमये (मुळशी पॅटर्न)

सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक: संतोष फुटाणे  (आणि डॉ.काशिनाथ घाणेकर)

सर्वोत्कृष्ट कथा : रवी जाधव, सचिन कुंडलकर  (न्युड)

सर्वोत्कृष्ट पटकथा: प्रवीण तरडे (मुळशी पॅटर्न)

सर्वोत्कृष्ट संवाद : विवेक बेळे (आपला माणूस)

सर्वोत्कृष्ट गीतरचना : वैभव जोशी (सविता दामोदर परांजपे)

सर्वोत्कृष्ट संगीत: राजेश सरकटे (मेनका उर्वशी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : वैशाली माडे (आम्ही दोघी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : जयतीर्थ मेऊंडी (पुष्पक विमान)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : सविता मालपेकर  (मुळशी पॅटर्न)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : प्रसाद ओक (फर्जंद)

लक्षवेधी अभिनेत्री घोषित : प्रितम कागणे ( अहिल्या झुंज एकाकी)

विशेष ज्युरी पुरस्कार दिग्दर्शन घोषित : प्रमोद पवार ( ट्रकभर स्वप्न )

विशेष ज्युरी  पुरस्कार घोषित : पाणी

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट : सविता दामोदर परांजपे

प्रथम पदार्पण कलाकार : तृप्ती तोरडमल  ( सविता दामोदर परांजपे )

प्रथम पदार्पण दिग्दर्शन: अभिजित देशपांडे (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर)

सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट : (अहिल्या झुंज एकाकी)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (विभागून) : कल्याणी मुळ्ये (न्युड), सोनाली कुलकर्णी (गुलाबजाम)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) : सुबोध भावे (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), ओम भुतकर (मुळशी पॅटर्न)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : प्रवीण तरडे (मुळशी पॅटर्न)

माध्यम पुरस्कार

पत्रकारिता पुरस्कार घोषित: शीतल करदेकर

पी.आर पुरस्कार घोषित: प्लॅनेट आर्ट एटंरटेन्मेंट मिडिया

सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदक (विभागून) : विनोद घाटगे ( ए .बी. पी माझा ),कपिल देशपांडे (टि.व्ही ९ मराठी )

सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम : स्पॉट लाईट (झी २४ तास)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s